श्री सदगुरु गोपाजीबाबा पतसंस्थेची उद्या होणार वार्षिक सर्वसाधारण सभा
श्री सदगुरु गोपाजीबाबा पतसंस्थेची उद्या होणार वार्षिक सर्वसाधारण सभा
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील बहादरपुर येथील श्री सदगुरु गोपाजीबाबा परिसर ग्रा.बि.शेती. सह. पतसंस्था मर्यादित बहादरपुर सन 2021-2022 आर्थिक वर्षाची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक 30/09/2022 सकाळी 10:00 वाजता संस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहेत.अशी माहिती संस्थेचे चेअरमन बाळासाहेब रहाणे यांनी दिली.सदर सभेपुढे येणारे विषय पुढील प्रमाणे माननीय अध्यक्षसाहेब यांना सभेचे अध्यक्ष स्थान स्विकारणेस विनंती करणे,मागील झालेल्या सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन 2021- 2022 सालच्या वार्षिक अहवाल तेरीज ताळेबंद नफा तोटा पत्रके वाचून मंजूर करणे, सन 2022 23 सालाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, मा.सरकारी ऑडीट यांनी दिलेल्या सन2021-2022 च्या ऑडीट रिपोर्टची नोंद घेणे,सन2022-2023 करीता वैधानिक लेखपरिक्षकांची नेमणूक करणे, नफा वाटणीस मंजुरी देणेबाबत,सहकारी कायदा1960कलम75(2) अन्यवे मा.संचालक मंडळ व त्याचे नातेवाईक यांचेकडे असलेल्या कर्जाच्या यादीचे वाचन करणे,मा.अध्यसाहेब यांच्या पुर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार विनिमय करणे इत्यादी विषयी चर्चा होणार आहे. तरी, सर्व सभासदांनी सभेत उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन बाळासाहेब रहाणे यांनी केले आहे.