ब्रेकिंग
आदिवासी पारधी समाजातील तरुण सर्वांसाठीच एक आदर्श बनला – सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड
आदिवासी पारधी समाजातील तरुण सर्वांसाठीच एक आदर्श बनला – सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड

कोपरगाव :- विनोद जवरे
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव या गावाकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून आत्तापर्यंत पाहिले जात असतानाच येथील एका आदिवासी पारधी जमातीतील एका तरुणांनी येथे आपला आदर्श दाखवत आपल्या समाजाबद्दल, गावाबद्दल इतरांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मोठा प्रयत्न करत येथे एक जणू इतिहास घडवला आहे. अशा या तरुणाचा शुक्रवारी येथे यथोचित सन्मान करण्यात आला. व त्याच्या या कर्तुत्वाला सर्वांनी सलाम केला. कोपरगावातील पढेगाव येथील आदिवासी पारधी समाजातील लोकांकडे, गावाकडे एक वेगळ्या भावनेतून पाहिले जाते. मात्र येथील आदिवासी पारधी समाजातील एक तरुण आपल्या या गावाकडे ,समाजाकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलावा म्हणून गेले काही वर्ष धडपडत आहे. त्याच्या या कर्तुत्वाला बहुतांशी यशही मिळाले आहे.रुख्युन भोसले या तरुणाने आपल्या गावात स्वतःची शेती विकसित करून बागायती करत स्वतःच्या मेहनतीवर पैसा कमवून जीवन कसे आनंदाने जगता येते हे दाखवून दिले आहे. आपल्या समाजाकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलण्याचा त्याचा प्रयत्न हा एक शून्यातून जग निर्माण करण्यासारखा आहे. आपल्याबरोबरच आपला समाज, आपले नातेवाईक यांना अशाच प्रकारे सुधारण्याचा या रुख्युन भोसले तरुणाचा प्रयत्न खरच नावाजण्यायोगा आहे. या तरुणाने आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर आपल्या समाजातील, नातेवाईकांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले व करत आहे. शिक्षण हेच ज्ञानामृत आहे व त्यातूनच पुढील जीवन यशस्वी होण्यासाठी समाजातील मुलांनी पुढे यावे.अशी या रुख्युन भोसले तरुणाची धडपड नेहमी सुरू असते. एवढेच नव्हे तर विविध कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रम घेऊन समाजाला नवी दिशा नवी अशा निर्माण करण्याचे काम सातत्याने हा तरुण करत असतो. या तरुणाने आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवला आहे. जेणेकरून कोणीही आपल्याविषयी शंका उपस्थित करणार नाही. आपले दररोजचे आदर्श काम कसे चालते हे इतरांनाही त्यातून समजेल. असा हा ध्येयवादी आदिवासी पारधी समाजातील तरुण सर्वांसाठीच एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आज परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात चर्चेला जात आहे. त्यामुळेच अशा या कर्तुत्वान तरुणाचा सत्कार पढेगाव येथे त्याच्या घरी जाऊन त्याच्या या कर्तुत्वाची दखल घेत आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड साहेब, पोलीस कॉन्स्टेबल वाखोरे दादा, सक्षम पोलीस टाईम्स चे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी पत्रकार अमर सर,कोपरगावं प्रतिनिधी पत्रकार शरद गोधडे,पढेगावचे सरपंच प्रकाश शिंदे यांनी या तरुणाचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा येथोचित सत्कार केला .त्याच्या कर्तुत्वाचे प्रयत्नाचे अभिनंदन केले ,सन्मान केला. त्यानंतर या सर्वांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारी नंबर 45 पढेगाव तालुका कोपरगाव येथे जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांनाही या संदर्भात मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना आपणही असेच शिक्षणातून ज्ञान प्राप्त करून वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे व्हा, असा सल्ला दिला. यावेळी शाळेच्या वतीने शिंगाडे सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व काही ग्रामस्थही उपस्थित होते.