ब्रेकिंग
बहादरबाद वि.का.सेवा.संस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
तज्ञ संचालक पदी अरूण निवृत्ती पाचोरे
बहादरबाद वि.का.सेवा.संस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोपरगांव । विनोद जवरे ।
आज रविवार दि.25/9/2022 रोजी आपल्या बहादराबाद वि.का.सेवा.सह.संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन श्री.साहेबराव पा.पाचोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.आजच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या हिताचे घेतलेले महत्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे संस्था स्वमालकीचे 250 मे.टनाचे गोडाऊन उभारून मालतारण कर्जसुविधा देणार,संस्था स्वखर्चाने सर्व सभासदांचा 1 लाखांचा विमा उतरविणार,सभासदांच्या संस्थेस दिलेल्या संपुर्ण तारणक्षेत्रास कर्जवितरण करणार, संस्था दोनचाकी व चारचाकी वाहनांना कर्जवितरण करणार,संस्था पीककर्ज,मध्यमुदत तसेच दिर्घमुदत कर्ज वितरण वाढविणार थकीत कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करणार
तसेच संस्थेची या आर्थिक वर्षात वसुली 92% व अनिष्ट तफावत 0% झाल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तज्ञ संचालक पदी अरूण निवृत्ती पाचोरे तसेच स्विकृत संचालक पदी संजय बाळकृष्ण पाचोरे व अजित रामनाथ पाचोरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . यावेळी सरपंच विक्रम पाचोरे,चेअरमन साहेबराव पाचोरे,व्हा.चेअरमन रामनाथ पाचोरे, दत्तुआप्पा पाचोरे, दत्तु पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, निवृत्ती पाचोरे, राजेंद्र पाचोरे, बाळासाहेब सो.पाचोरे, रविंद्र कुरकुटे, कैलास पाचोरे, पाटीलबा पाचोरे गोवर्धन पाचोरे, एकनाथ पाचोरे, बंडू पाचोरे, सोमनाथ पाचोरे, सचिव सुनिल पाडेकर यांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते