थोरात कारखाना कार्यस्थळावर ( १३ ऑगस्ट ) पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

थोरात कारखाना कार्यस्थळावर ( १३ ऑगस्ट ) पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात


थोरात कारखाना कार्यस्थळावर ( १३ ऑगस्ट ) पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात
वै.स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य ह.भ.प रामभाऊ महाराज गावडे यांचे प्रेरणेने व ह.भ.प. गुरुवर्य कलामाई यांचे कृपाशिर्वादाने व ह.भ.प.गोविंद महाराज करंजकर तसेच ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे यांचे मार्गदर्शनाखाली सलग ४१ व्या वर्षी या सप्ताहाचे आयोजन होत आहे.या सप्ताहाची घटस्थापना गुरुवार दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा पांडुरंग घुले व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई पांडुरंग घुले यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकड भजन,सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, सकाळी ११ ते १२ गाथा भजन,सायं.४.३० ते ५.३० सामु.हरिपाठ, सायं.५.३० ते ६.३० ज्ञानेश्वरी प्रवचन,सायं ७ ते ९ हरिकिर्तन नंतर हरिजागर होणार आहे.

यामध्ये गुरुवार दि.१३ ऑगस्ट ते गुरुवार दि.२० ऑगस्ट २०२६ पर्यंत ह.भ.प.हिराबाई जोंधळे (संगमनेर),ह.भ.प.सौ सोनालीताई नरोडे (सायखींडी),ह.भ.प.शशिकलाताई सूर्यवंशी ( संगमनेर ), ह.भ.प.मीनाताई सुपेकर ( घुलेवाडी), ह.भ.प.आशाताई वर्पे (आळंदी), ह.भ.प.अलकाताई मोहटे (आळंदी), ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे( संगमनेर) संपूर्ण सप्ताह काळात दररोज ज्ञानेश्वरी अध्याय प्रवचन सेवा देणार आहे.गुरुवार दि. १३/०८/२०२६ रोजी जयश्रीताई तिकांडे ( राजापूर ), शुक्रवार दि.१४ रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज उंबरकर ( उंबरी ),शनिवार दि.१५ रोजी ह.भ.प. शरद महाराज ढवळे ( काकडवाडी ), रविवार दि.१६ रोजी ह.भ.प.अरुण महाराज फरगडे ( निमगाव पागा ), सोमवार दि.१७ रोजी ह.भ.प.व्यंकटेश महाराज सोनवणे ( निमगाव भोजापूर ) , मंगळवार दि. १८ रोजी गोविंद महाराज करंजकर ( बीड ), बुधवार दि..१९ रोजी सुदाम महाराज कोकणे ( धांदरफळ ) यांचे कीर्तन सेवा होणार होणार असून गुरुवार दि.२०/०८/२०२६ सकाळी ९. ते ११ कथा प्रवक्ते व कीर्तनकार ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील ( बुलढाणा ) यांचे काल्याचे कीर्तन व सोहळ्याची सांगता होईल.दीपोत्सव बुधवार १९/०८/२०२६ रोजी सायं.६.३० कारखान्याचे चेअरमन लोकनेते मा.आमदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. असून यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे,आ.सत्यजीत तांबे,इंद्रजितभाऊ थोरात,डॉ.जयश्रीताई थोरात,व्हा.चेअरमन पांडुरंग पा.घुले यांचे सह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,कार्याध्यक्ष,सेक्रेटरी,



