ब्रेकिंग

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे

जाहिरात मो-7756045359
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे

कोपरगांव । प्रतिनिधी । तालुक्याची कामधेनु असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिनार कुदळे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर कारखान्याचे मार्गदर्शक व माजी आमदार अशोक काळे आणि आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे यांनी काम पाहिले.सत्काराला उत्तर देताना कुदळे म्हणाले, तालुक्याचे सक्षम नेतृत्व अशी ओळख असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवीली. अशा सक्षम नेतृत्वासमवेत काम करण्याची संधी मिळणे हा माझा सन्मान आहे. सर्वांना सोबत घेऊन जबाबदारी पार पाडू. कर्मवीर शंकरराव काळे आणि माजी आमदार अशोक काळे यांच्या नेतृत्वाचा वारसा या कारखान्याला लाभला आहे. संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदासाठी कुदळे यांच्या नावाची सुचना सुनील मांजरे यांनी मांडली,राजेंद्र घुमरे यांनी अनुमोदन दिले.यावेळी बोलतांना मावळते उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी कुदळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सचिन चांदगुडे, ॲड. राहुल रोहमारे, अनिल कदम, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, अशोकराव मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण,सौ.इंदूबाई शिंदे, सौ.वत्सलाबाई जाधव, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!