ब्रेकिंग

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील-माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनी विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील-माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनी विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी । सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी संस्थेची वाटचाल ही कायम गुणवत्ता पूर्ण राहिली आहे. या संस्थेच्या विविध शाखांमधून अनेक विद्यार्थी देशात व विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहे. जगातील बदलांबरोबर नवीन अभ्यासक्रम गरजेचे झाले असून अमृतवाहिनी विद्यापीठ हे गुणवत्तेमुळे देशातील मोठे विद्यापीठ ठरेल असा विश्वास राज्याचे मा. महसूल व शिक्षणमंत्री तथा अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमृत कला मंच येथे अमृतवाहिनी विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर मा. आ. डॉ सुधीर तांबे, ॲड माधवराव कानवडे, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, डॉ  रोहित डूबे पाटील, पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, रणजीतसिंह देशमुख, डॉ जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, सिने अभिनेत्री इशिता शर्मा, सुधाकर जोशी, के.के थोरात, अजय फटांगरे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, विलास वरपे, तुळशीनाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्रा. व्ही बी.धुमाळ, डॉ. जे बी गुरव यांच्यासह विविध पदाधिकारी व प्राचार्य उपस्थित होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रिमोट द्वारे अमृतवाहिनी विद्यापीठाच्या फलकाचे अनावरण व वेबसाईटचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता सह्याद्री बहुजन शिक्षण संस्थेची स्थापना केली. याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षण मिळावे याकरता अमृतवाहिनी शिक्षण संस्था स्थापन केली. 49 वर्षांच्या वाटचालीमध्ये अमृतवाहिनी संस्थेचा वटवृक्ष झाला असून गुणवत्तेमुळे देशांमध्ये लौकिक निर्माण झाला आहे.विविध शाखांमधील अनेक माजी विद्यार्थी देशात आणि विदेशावर मोठ्या पदांवर कार्यरत आहे. मागील दोन वर्षांपासून कृषी महाविद्यालय सुरू झाले असून फूड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय आता सुरू झाले आहे. राज्यभरातील पालक आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी शासकीय महाविद्यालयानंतर अमृतवाहिनीला पहिले प्राधान्य देत आहे.

अमृतवाहिनी विद्यापीठामुळे जगामध्ये होणाऱ्या बदलांबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरता काम केले जाणार आहे .याकरता जगभरातील विद्यापीठांशी समन्वय केला आहे. गुणवत्ता ही वैशिष्ट आपले कायम राहिले असून पुढील काळातही गुणवत्तेमुळे अमृतवाहिनीचा लौकिक जगभरात होणार असून हे विद्यापीठ आगामी काळात देशातील मोठे विद्यापीठ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अमृतवाहिनीच्या नाव लौकिकामुळे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ,विधानसभा, विधानपरिषद या सर्वांनी  मंजुरी दिली असून सर्व निकष पूर्ण केले आहेत. या सर्व कामांमध्ये सर्वांचे योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना येणाऱ्या पाच वर्षांमध्ये सर्व आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह हे विद्यापीठ उभे असेल. बी टेक व एम टेक चे प्रवेश सुरू झाले असून पालकांची पहिली पसंती अमृतवाहिनी विद्यापीठाला असल्याचे ते म्हणाले.तर मा आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या विभागाला नेतृत्व दिले सहकार, शिक्षण, कृषी या सर्व क्षेत्रांमध्ये आज संगमनेर तालुका अग्रगणने बनवला. अमृतवाहिनी विद्यापीठ हा संस्थेच्या इतिहासातील सुवर्णक्षण असून स्वर्गीय वसंत दादा पाटील यांच्या विनाअनुदानित महाविद्यालय देण्याच्या निर्णयाने महाराष्ट्रात शैक्षणिक व सामाजिक क्रांती झाली आहे. सौ शरयूताई देशमुख व त्यांच्या सर्व टीमने सांघिक प्रयत्न केले असून हा आनंदाचा क्षण आहे .याचबरोबर ज्ञानाचे क्षेत्र आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक व्यापक ठरणार असल्याचे ते म्हणाले.तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की अमृतवाहिनीच्या आणि संगमनेरच्या इतिहासातील आनंदाचा क्षण आहे. तीर्थरूप सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी उभे केलेले शिक्षणाची हे विश्व आता मोठे होत आहे. अमृतवाहिनीने गुणवत्ता जपली असून प्रत्येक माणूस आयुष्यभर विद्यार्थी असून काहीतरी शिकत असतो. हे विद्यापीठ नक्कीच संशोधन व नवनिर्मितीसाठी मोठे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर डॉ रोहित दुबे पाटील म्हणाले की विद्यापीठाच्या मान्यता व वाटचालीमध्ये सर्व सहकाऱ्यांचे मोठे योगदान राहिले.या कार्यक्रमात डॉ. निंबाळकर यांनी विद्यापीठाविषयी माहिती दिली. प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी केले. तर व्यवस्थापक प्रा. व्हि. बी धुमाळ यांनी आभार मानले.यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकार शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते सर्व विभागांचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृतवाहिनी विद्यापीठाचा शानदार शुभारंभ

गुणवत्ता हे संगमनेरचे वैशिष्ट्य असून अमृतवाहिनी विद्यापीठाबरोबर संगमनेरचे नाव मोठे होणार आहे .लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अमृतवाहिनी विद्यापीठ फलकाचे अनावरण करण्यात आले. याचबरोबर फार्मसी विभागाच्या कॉस्मेटोलॉजी या नवीन अभ्यासक्रमाचे बी टेक व एम टेक चे प्रवेश सुरू झाले आहे. अमृतवाहिनी विद्यापीठाच्या शुभारंभाने संगमनेर शहर व तालुक्याच्या शिरपेचामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा तुरा रोवला असल्याने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, संगमनेर तालुक्यामध्ये व शिक्षण क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!