ब्रेकिंग

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; Helping Hand 19 टीमचा रायगडमध्ये सामाजिक उपक्रम

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; Helping Hand 19 टीमचा रायगडमध्ये सामाजिक उपक्रम

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; Helping Hand 19 टीमचा रायगडमध्ये सामाजिक उपक्रम

रायगड । प्रतिनिधी । Helping Hand 19 टीमच्या वतीने रायगड येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरजू लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग यांसह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यासोबतच गरजू नागरिकांना ब्लँकेट तसेच इतर आवश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न Helping Hand 19 टीमच्या माध्यमातून करण्यात आला.शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!