ब्रेकिंग

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या कु. संबोधी आहेरचे राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या कु. संबोधी आहेरचे राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश

जाहिरात मो-7756045359
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या कु. संबोधी आहेरचे राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश
संगमनेर । प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग कल्चरल फेस्टिव्हलच्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये अमृतवहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, अमृतनगर येथील वि‌द्यार्थिनी कु. संबोधी आहेर हिने आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दोन पारितोषिके पटकावून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे

कु. संबोधी आहेर हिने सेमी-क्लासिकल मॉडेल डान्स या प्रकारात आपल्या अप्रतिम नृत्याविष्काराने परीक्षकांची मने जिंकत ‌द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तसेच सोलो सिंगिंग – लोकगीत या प्रकारातही तिने आपल्या सुरेल व दमदार गायनाने परीक्षकांची दाद मिळवत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.नृत्य आणि गायन या दोन्ही कला प्रकारांत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून तिने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या दुहेरी यशाब‌द्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री मा. नामदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल शिंदे व्यवस्थापक प्राचार्य व्ही बी धुमाळ डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे.बी. गुरव तसेच प्राचार्य आशिष कुमार यांनी कु. संबोधी आहेर हिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!