ब्रेकिंग

मा. मंत्री बाळासाहेब थोरात हे कायम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

एक तालुका एक परिवार ही संकल्पना संगमनेर तालुक्यात आजही कायम

मा. मंत्री बाळासाहेब थोरात हे कायम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

जाहिरात मो-7756045359

एक तालुका एक परिवार ही संकल्पना संगमनेर तालुक्यात आजही कायम

संगमनेर । प्रतिनिधी । कधीकाळी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून प्रगतशील बनवला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम कटिबद्ध आहेत
तालुक्यातील प्रत्येक गावांमधील नागरिकांची दररोज मोठी  गर्दीकायम असून एक तालुका एक परिवार ही संकल्पना संगमनेर तालुक्यात जात असून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम जनतेमध्ये आहेत.

मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कामातून सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केले आहे. संगमनेर तालुका हा त्यांनी परिवार मानला असून मागील 40 वर्षात एकही दिवस विश्रांती न घेता जनतेसाठी काम केले आहे.सत्तेत असो वा नसो त्यांचा शब्द हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर प्रमाण असून सर्वसामान्य नागरिकांसाठी ते कायम आधारवड राहिले आहे. महसूल मंत्री कृषी मंत्री शिक्षण मंत्री अशी महत्त्वाची खाती त्यांनी भूषवली असून सध्या काँग्रेसच्या अत्यंत महत्त्वाच्या वर्किंग कमिटीचे ते सदस्य आहेत किंबहुना देशभरातील महत्त्वाच्या 21 नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. सध्याचे राज्यातील सत्ताधारी किंवा प्रशासनातील अधिकारी सुद्धा त्यांचा शब्द कधी टाळत नाही.शांत संयमी सर्वांना समजून घेणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व असून सर्वसामान्य जनतेसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम अशा स्थान राहिले आहे त्यामुळे विविध सामाजिक व्यक्तिगत प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांची त्यांच्याकडे कायम मोठी गर्दी असते.

संगमनेर तालुक्यातील सहकार शिक्षण संस्था ग्रामीण विकास विविध वैभवशाली इमारती पायाभूत सुविधा याचबरोबर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण दोन्ही कालवे ही ऐतिहासिक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत याचबरोबर संगमनेर मध्ये शांतता व सुव्यवस्था राखून संगमनेरला राज्यात अग्रगण्य बनवले आहे.यशोधन जनसंपर्क कार्यालय हे तालुक्यातील व राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायम खुले असून या माध्यमातून शासनाच्या योजना व्यक्तिगत कामे यांसाठी पाठपुरावा केला जातो  लोकनेते बाळासाहेब थोरात सुदर्शन निवासस्थान यशोधन कार्यालय कारखाना नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असतात तर दररोज तालुक्यातील विविध कार्यक्रम, अनेक नागरिकांच्या नवीन व्यवसायांची उद्घाटणे, विविध विकास कामे, सहकारी संस्था याचबरोबर राज्यातील अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी त्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरत आहे.
प्रत्येकाचा प्रश्न समजून घेणे, त्याला समजावून सांगा त्याचा प्रश्न मार्गी लावणे ही त्यांची हातोटी असून थेट भेट आणि सर्वांना समजून घेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे तालुका जिल्हा व राज्यभरातून नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने आपले प्रश्न घेऊन येत असून सर्वांचे समाधान लोकनेते बाळासाहेब थोरात हे त्यांच्या पातळीवर करत आहेत .

संगमनेर प्रामाणिकपणा ही ओळख लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे

राज्यभरात कुठेही गेले तरी संगमनेर कर म्हटले की आम्हाला मोठा सन्मान मिळतो. तुम्ही थोरात साहेबांच्या तालुक्यातील म्हणून मानसन्मान दिला जातो. प्रामाणिक माणूस म्हणून गौरव केला जातो ही सर्व ओळख लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या कामातून मिळत असून त्यांच्यामुळे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला राज्यभरात सन्मान मिळत आहे

इंजिनीयर इंद्रभान चौधरी
          कनोली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!