रक्तदानातून माणुसकीचा संदेश’; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची महारक्तदान शिबिराला भेट
संगमनेरकरांचा रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग

रक्तदानातून माणुसकीचा संदेश’; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची महारक्तदान शिबिराला भेट


संगमनेरकरांचा रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महारक्तदान शिबिराला’ संगमनेर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी भेट देत रक्तदात्यांशी व आयोजकांशी संवाद साधला.

या रक्तदान शिबिराला संगमनेर शहरातील नागरिक, विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत डॉ. मैथिली तांबे यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणे ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.“आपली छोटीशी मदतही एखाद्या गरजू कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे मनापासून आभार,” असे डॉ. मैथिली तांबे यांनी यावेळी सांगितले.या स्तुत्य आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.



