ब्रेकिंग

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे महादेव देवस्थानांसह तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास – आमदार सत्यजित तांबे

आमदार सत्यजित तांबे यांनी खिचडी बनवून भाविकांना केले प्रसादाचे वाटप

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे महादेव देवस्थानांसह तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास – आमदार सत्यजित तांबे

जाहिरात मो-7756045359
आमदार सत्यजित तांबे यांनी खिचडी बनवून भाविकांना केले प्रसादाचे वाटप
संगमनेर । प्रतिनिधी । तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासातून वैभव कडे जाणारा ठरला आहे. या प्रगती बरोबर तालुक्यातील प्रत्येक गावांमधील देवस्थाने त्याचबरोबर तालुक्यात असलेल्या महादेव क्षेत्रासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी दिला असून हे सर्व क्षेत्र अध्यात्माची तीर्थक्षेत्र ठरले असल्याचे प्रतिपादन     असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

खांडगाव येथील खंडेश्वर व बुद्रुक येथील रामेश्वर येथे आमदार सत्यजित तांबे यांनी श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्त पूजा केली यावेळी समवेत देवस्थानचे अध्यक्ष लहान भाऊ गुंजाळ, दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ, सचिव अशोक गुंजाळ, भास्कर गुंजाळ ,संजय गुंजाळ, कपिल गुंजाळ, श्रीरंग गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ ,नारायण गुंजाळ, भाऊ पाटील गुंजाळ आदी उपस्थित होते तर रामेश्वर या ठिकाणी बाळासाहेब देशमाने, रामहरी कातोरे, अध्यक्ष सुनील देशमुख, विजय कोल्हे, सचिव दत्ता कासार ,माजी सभापती अनिल देशमुख, सावळेराम साबळे ,नवनाथ नाईकवाडी, नवनाथ देशमाने ,अमोल महाले, मॅनेजर संजय थोरात ,कोमल उगले, सरपंच सौ उज्वला देशमाने, प्रिया मस्के, सारिका परदेशी ,संगीता देशमुख ,स्वदेश युवा प्रतिष्ठान व स्वदेश महिला मंचच्या विविध पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे. 110 किलोमीटर लांबी असलेल्या या तालुक्यांमध्ये पठार भाग प्रवरा पट्टा आणि तळेगाव असे भौगोलिक तीन विभाग पडतात. सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आदर्शवत बनवला आहे. कृषी सहकार शिक्षण शहरातील बाजारपेठ पायाभूत सुविधा यांसह तालुक्यांमध्ये अध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण केले आहे. एकता व मानवता हा धर्म जोपासताना सर्व गावांमधील मंदिरांना मोठा निधी दिला आहे. सभा मंडपासह मंदिरांचे सुशोभीकरण केले आहे.तालुक्यामध्ये खांडेश्वर ,बाळेश्वर, रामेश्वर ,नीझरनेश्वर, दुधेश्वर अमृतेश्वर हे सर्व देवस्थाने  विकास कामांमधून आदर्शवत बनवली आहे. विविध देवस्थानांना पर्यटन विभागाच्या माध्यमातून दर्जा मिळून देत सुशोभीकरण व भाविकांना चांगल्या सुविधा निर्माण करून दिले आहे. खांडगाव देवस्थान मध्ये शहरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. अत्यंत निसर्गरम्य हा परिसर असून सर्वांनी श्रावण महिन्यात दर्शनासाठी यावे असा हा परिसर आहे. संगमनेर तालुका हा अध्यात्माचे मोठे क्षेत्र बनले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर यापुढील काळातही प्रत्येक गावांमधील विकास कामांबरोबर तीर्थक्षेत्रांच्या विकासाबाबत कुठेही निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी रामेश्वर देवस्थानच्या साठी बाळासाहेब देशमाने व प्रदेश समूहाच्या वतीने रामेश्वर मुकुटाचे अर्पण आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महादेव तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठी गर्दी

खंडेश्वर, निझरनेश्वर, रामेश्वर, अमृतेश्वर दुदेश्वर या सर्व महादेवांच्या ठिकाणी आज भाविकांची मोठी गर्दी होती तिसऱ्या सोमवार निमित्त आमदार सत्यजित तांबे यांनी खांडगाव येथे खिचडी बनवली याचबरोबर सर्व भाविकांची आस्तेवाईकपणे चौकशी करून भाविकांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी सर्व भाविकांनी हर हर महादेव म्हणत प्रसादाचा आनंद घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!