ब्रेकिंग
श्री संत सद्गुरु गोपाजी बाबा यात्रा उत्सवाला भाविकांचा महासागर
गोपाजी बाबांच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

श्री संत सद्गुरु गोपाजी बाबा यात्रा उत्सवाला भाविकांचा महासागर


गोपाजी बाबांच्या जयघोषाने दुमदुमला परिसर
कोपरगांव । प्रतिनिधी । श्री क्षेत्र बहादरपुर येथे श्री संत सद्गुरू गोपाजी बाबा यात्रा महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

यात्रेच्या निमित्ताने महाआरती, कावडी व मशाल सोहळा, भव्य मिरवणूक तसेच भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरू गोपाजी बाबांचे दर्शन घेतले. भाविकांच्या मनोरंजनासाठी सद्गुरू स्वरांजली ग्रुपचा भक्तिमय कार्यक्रम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. स्वरांजली ग्रुपने आपल्या सुरेल भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक श्रद्धेसोबतच मनोरंजनाची मेजवानी भाविकांना अनुभवता आली. यात्रेतील भव्य कुस्त्यांच्या आखाड्यात नामवंत मल्लांनी आपले कौशल्य दाखवून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण यात्रा उत्सवात व शिस्त आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. या सर्व कार्यक्रमांचे समस्त खकाळे परिवार व बहादरपुर ग्रामस्थांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ, आयोजक, सेवेकरी व सर्व सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे गोपाजी बाबा यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झाल्याचे बघायला मिळाले






