पुनम खेमनर हिची इंटरझोनल महिला क्रिकेट स्पर्धेसाठी झालेली निवड ही जिल्ह्याकरीता अभिमानास्पद – मंत्री विखे पाटील


पुनम खेमनर हिची इंटरझोनल महिला क्रिकेट स्पर्धेसाठी झालेली निवड ही जिल्ह्याकरीता अभिमानास्पद – मंत्री विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी । मुंबई इंडियणच्या महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू पुनम खेमनर हिची बंगळूरु येथे संपन्न होणा-या इंटरझोनल महिला क्रिकेट स्पर्धेसाठी झालेली निवड ही अहिल्यानगर जिल्ह्याकरीता अभिमानास्पद असून, क्रिकेट खेळातील खेळाडूंना प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

पुनम खेमनर ही शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी बुद्रूक येथील खेळाडू असून, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थीनी आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने तिला प्रोत्साहन देण्यासाठी पालकत्वही स्विकारले आहे. झालेल्या निवडी बद्दल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुनम खेमनर हिचे अभिनंदन केले आहे.आपल्या जिद्द आणि महेनतीच्या बळावर तसेच क्रिकेट खेळामध्ये राखलेल्या सातत्यामुळेच पुनम खेमनर हिचा क्रिकेट खेळोतील यशाचा आलेख उंचावला आहे. यापुर्वीही महिलांच्या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेमध्ये तिने उत्तुंग कामगिरी केली. बडोदा क्रिकेट असोशिएशनचे प्रतिनिधीत्व करताना तीने आपल्या जादुई खेळातून कतृत्व सिध्द करून दाखविले होते.पुनम खेमनर ही शिर्डी विधानसभा मतदार संघातील असल्याचा निश्चितच आपल्याला अभिमान असून, तिच्या कतृत्वामुळे मतदार संघाचा तसेच अहिल्यानगरचा नावलौकीक वाढला आहे. राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळातील तिचा प्रवास यशाच्या दिशेने सुरु असून, भविष्यात आणखी संधी मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



