ब्रेकिंग

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यातील A+ श्रेणी प्राप्त एकमेव महाविद्यालय

जाहिरात मो -7756045359
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यातील A+ श्रेणी प्राप्त एकमेव महाविद्यालय

कोपरगाव । प्रतिनिधी । “महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत SQAAF अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत झालेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनात स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला A+ श्रेणी प्राप्त झाली असून के. बी. रोहमारे महाविद्यालय हे A+ श्रेणी प्राप्त करणारे कोपरगाव तालुक्यातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे”, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.

याविषयी अधिक माहिती देताना के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे म्हणाले की “बाह्य मूल्यांकनासाठी आलेल्या समितीने महाविद्यालयात राबविले जाणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक प्रयोगशाळा, विविध कोर्सेस, विद्यार्थी संख्या, अध्यापनातील नवीन तंत्रज्ञानाचा विपुल वापर, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात सुसज्ज सी.सी.टी.व्ही. यंत्रणा तसेच सुरक्षा रक्षकांचे योग्य नियोजन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय आदी बाबींचा विचार करूनच समितीने A+ ही सर्वोच्च श्रेणी प्रदान केली असल्याने संस्था व महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे.”महाविद्यालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालक तसेच कोपरगाव परिसरातील नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला असून महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाच्या या यशामागे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, अध्यापक वृंद, कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अथक परिश्रम दडलेले आहेत. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिलेले प्राधान्य यामुळे महाविद्यालयाने ही कामगिरी साध्य केली असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून येत आहेत. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव एड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालय प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!