जवळकेच्या मातीतील कीर्तनसेवा थेट गोव्याच्या भूमीत; ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांची गोव्यात कीर्तन

जवळकेच्या मातीतील कीर्तनसेवा थेट गोव्याच्या भूमीत; ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांची गोव्यात कीर्तन


जवळकेच्या मातीतील कीर्तनसेवा थेट गोव्याच्या भूमीत; ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांची गोव्यात कीर्तन
कोपरगांव । प्रतिनिधी । ग्रामीण भागातून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन अध्यात्म, भक्ती आणि प्रबोधनाची सेवा करणारे ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांची कीर्तनसेवा आता थेट गोवा राज्यात रंगणार आहे. मूळचे जवळके, ता. कोपरगाव येथील असलेल्या महाराजांचे कीर्तन गोव्यातील पालये,तुये पेडणे (गोवा) येथे आयोजित करण्यात आले आहे.श्रावण चौथा गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता सिद्धी साई भक्त मंडळाच्या वतीने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण मातीतून भक्तीचा सुगंध गोव्यापर्यंत!
“जवळकेच्या मातीतून सुरू झालेली कीर्तनसेवा आज गोव्याच्या भूमीत पोहोचत आहे, ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. वारकरी संप्रदायाची सेवा आणि संतविचारांचा प्रसार करण्याचे कार्य साईराम महाराज सातत्याने करत आहेत.”
ग्रामीण भागातून आलेल्या साईराम महाराजांनी आपल्या ओघवत्या वाणीने, संतांच्या विचारांनी आणि भक्तिमय कीर्तनातून वारकरी संप्रदायाची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या कीर्तनातून भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधन, संस्कार आणि संतविचारांचा जागर केला जातो.जवळकेसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली ही कीर्तनसेवा आता थेट गोव्यापर्यंत पोहोचत असल्याने जवळकेसह कोपरगाव तालुक्यातील वारकरी, ग्रामस्थ आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



