ब्रेकिंग

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संगमनेर । प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुक्यातील गणेशभक्तांच्या भावनेचा विचार करून गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केली आहे.यासंदर्भात आमदार तांबे यांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तसेच कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर पाटबंधारे विभाग यांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.संगमनेर शहर व तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पुरेसे पाणी असणे अत्यावश्यक आहे. मात्र, नदीपात्रात पाणी उपलब्ध नसल्याने यापूर्वीही गणेश विसर्जनाच्या वेळी अडचणी निर्माण झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये पाणी नसल्यामुळे गणेश विसर्जन तब्बल १५ दिवस पुढे ढकलावे लागले होते, याचीही आठवण डॉ. मैथिली तांबे यांनी प्रशासनाला करून दिली.गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेर शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने गणेशभक्त प्रवरा नदीपात्राकडे येतात. त्यामुळे कोणतीही गैरसोय होऊ नये आणि गणेशमूर्तींचे विसर्जन धार्मिक परंपरेनुसार व सुरळीतपणे पार पडावे, यासाठी प्रवरा नदीपात्रात आवश्यक पाण्याचे आवर्तन वेळेत सोडणे अत्यंत गरजेचे आहे अशी भूमिका व्यक्त करत पाणी सोडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!