AIच्या ‘विंटेज फॅशन’ ट्रेण्डमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांचा स्टायलिश लूक; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

अहिल्यानगर । प्रतिनिधी । सोशल मीडियावर सध्या विंटेज आणि रेट्रो फॅशनचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. १९८०-९०च्या दशकातील कपडे, हेअरस्टाईल, गॉगल्स आणि जुन्या काळातील फोटोग्राफीचा लूक यांचा वापर करून एआयच्या माध्यमातून फोटो तयार करण्याची क्रेझ तरुणाईमध्ये वाढली आहे. याच ट्रेण्डमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा स्टायलिश विंटेज लूकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांचा डबल डेनिम लूक पाहायला मिळत असून, डेनिम शर्ट/जॅकेट आणि जीन्सच्या या स्टाईलला ‘टेक्सास टक्सेडो’ म्हणूनही ओळखले जाते. ७० आणि ८०च्या दशकात ही फॅशन विशेष लोकप्रिय होती. त्यासोबतच रेट्रो हेअरस्टाईल, गॉगल्स आणि जुन्या फिल्म कॅमेऱ्याचा फील देणारी रंगसंगती यामुळे फोटोला त्या काळातील खास अंदाज मिळाला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचा हा फोटोही याच ट्रेण्डचा भाग असून, ‘फोटो नवा, पण अंदाज जुन्या काळाचा’ अशा हटके शैलीमुळे तो सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.