ब्रेकिंग
7200 किमी प्रवास करणाऱ्या मोनू बेतोराचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरव
मोनूची आईप्रती निष्ठा आणि समर्पण हे युवकांसाठी प्रेरणादायी - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

7200 किमी प्रवास करणाऱ्या मोनू बेतोराचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरव


मोनूची आईप्रती निष्ठा आणि समर्पण हे युवकांसाठी प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीमध्ये आई – वडिलांना परमेश्वराचे स्थान आहे. आई – वडिलांची सेवा ईश्वर सेवा मानून आईच्या आदर्श विचारांचा वारसा जपत बिहार पाटणा येथील मोनू बेतोरा यांनी पायी धावत देशातील 12 ज्योतिर्लिंग व 4 धामांची यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून 7200 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या मोनू बेतोरा यांचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला असून मोनूचे आईप्रती असलेले समर्पण हे युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोजगार त्यांनी काढले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मोनू बेतोरा यांचे स्वागत मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले यावेळी समवेत युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, उद्योजक बाळासाहेब देशमाने, योगेश देशमुख, हर्षल काकड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, बिहार राज्यातील मोनू बेतोरा यांनी आई – वडिलांचा संस्कारांचा वारसा होऊन देशातील बारा ज्योतिर्लिंग आणि चार धामांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. भारत हा विविध संस्कृती भाषा प्रांत यांनी बनलेला असून 22 वर्षीय मोनूचा हा धावत होणारा प्रवास देशाच्या एकात्मतेचा संदेश देणार आहे.बिहार, झारखंड,तेलंगणा,तामिळनाडू,केरळ, कर्नाटक असा प्रवास करून तो महाराष्ट्रात आला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर,त्र्यंबकेश्वर,घृष्णे श्वर याचबरोबर विविध शंकरांच्या मंदिरांचे तो दर्शन घेत आहे. अध्यात्म आणि संस्कृती याचबरोबर देशाच्या एकात्मतेचा विचार तो तरुणांना देत आहे.दररोजचा त्याचा प्रवास हा निष्ठा प्रेम समर्पण दर्शविणारा असल्याचे ते म्हणाले.तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आई – वडिलांच्या संस्कारातून देशभरातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन धावत घेण्याचा हा अभिनव उपक्रम नक्कीच अभिमानास्पद आहे. देशामध्ये नेहमीच अतिथींचे स्वागत होत असून विविध गावांमधून त्याचे नागरिक जोरदार स्वागत करत आहे.तरुणांमध्ये त्याच्याप्रती मोठी अस्था आहे. महाराष्ट्रातून आणि संगमनेर तालुक्यातून विविध ठिकाणी मोनू ने केलेल्या प्रवास हा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.तर मोनू बेतोरा म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये माझे आहोत पूर्व स्वागत झाले. संगमनेर मध्ये आल्यानंतर मला घरी आल्यासारखे वाटले. डॉ.जयश्रीताई थोरात यांनी अत्यंत काळजी घेतली तर महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना भेटण्याची मोठी इच्छा होती. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर संगमनेर मार्गे जाणार म्हटल्यानंतर त्यांना भेटावे असे मनात होते आणि योगायोगाने त्यांची भेट झाली हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे. इतके मोठे नेते असूनही साधेपणा हे त्यांचे वैशिष्ट्ये माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आणि आशीर्वादाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. अमृतेश्वर व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेऊन ते पुढे रवाना झाले. यावेळी युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मोनू बेतोरा यांचे स्वागत मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले यावेळी समवेत युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, उद्योजक बाळासाहेब देशमाने, योगेश देशमुख, हर्षल काकड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, बिहार राज्यातील मोनू बेतोरा यांनी आई – वडिलांचा संस्कारांचा वारसा होऊन देशातील बारा ज्योतिर्लिंग आणि चार धामांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. भारत हा विविध संस्कृती भाषा प्रांत यांनी बनलेला असून 22 वर्षीय मोनूचा हा धावत होणारा प्रवास देशाच्या एकात्मतेचा संदेश देणार आहे.बिहार, झारखंड,तेलंगणा,तामिळनाडू,केरळ,



