बहादरपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रामनाथ पाडेकर यांची बिनविरोध निवड
बहादरपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रामनाथ पाडेकर यांची बिनविरोध निवड
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील बहादरपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काळे गटाचे रामनाथ पाडेकर यांची आज शुक्रवार (दि.30) बिनविरोध निवड झाली यावेळी निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून उपअभियंता सी.डी.लाटे तसेच ग्रामसेवक जी.डी. कारले यांनी काम पाहिले.
बहादरपुर ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी लढत होऊन चुरशीची झाली. अनेक वर्षा नंतर मतदारांनी परिवर्तन घडवत काळे गटाचे गोपीनाथ रहाणे यांना निवडुन आणत ग्रामपंचायतीत काळे गटाकडे एकहाती सत्ता दिली. उपसरपंच पदी रामनाथ पाडेकर यांच्या नावाची सुचना नुतन सदस्य भाऊसाहेब रहाणे यांनी मांडली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने पाडेकर यांची बिनविरोध निवडीची घोषणा सरपंच गोपीनाथ रहाणे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निरीक्षक यांचा उपस्थितीत केली.
यावेळी नुतन सदस्य भाऊसाहेब रहाणे,चित्रा रहाणे,सरला रहाणे,निर्मलाबाई रहाणे,कविता रहाणे तसेच गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडी बद्दल माजी आमदार अशोक दादा काळे तसेच युवा आमदार आशुतोष दादा काळे यांनी अभिनंदन केले.