बहादरबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अनिता पाचोरे यांची बिनविरोध निवड
बहादरबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अनिता पाचोरे यांची बिनविरोध निवड
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील बहादरबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे अनिता पाचोरे यांची आज शुक्रवार (दि.30) बिनविरोध निवड झाली यावेळी निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार पी.डी.पवार तसेच ग्रामसेवक अनिता दिवे व किशोर गटकळ यांनी काम पाहिले.
बहादरबाद ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी लढत होऊन कोल्हे गटाचे अश्विनी विक्रम पाचोरे यांना निवडुन आणत ग्रामपंचायतीत कोल्हे गटाकडे एकहाती सत्ता दिली. उपसरपंच पदी अनिता पाचोरे यांच्या नावाची सुचना नुतन सदस्य गिताराम पाचोरे यांनी मांडली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने पाचोरे यांची बिनविरोध निवडीची घोषणा सरपंच अश्विनी पाचोरे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निरीक्षक यांचा उपस्थितीत केली.
यावेळी नुतन सदस्य गिताराम पाचोरे,दिपाली जोंधळे, कल्याणी पाचोरे, धनंजय पाचोरे ,कु.आरती पाचोरे यांचा निवडी बद्दल माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपिन दादा कोल्हे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे आदींनी अभिनंदन केले.