लोकनेते मारुतीराव गव्हाणे प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
लोकनेते मारुतीराव गव्हाणे प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
कोपरगांव । विनोद जवरे ।
जवळके येथे लोकनेते मारूतीराव सखाराम पा.गव्हाणे प्रिमीयर लीग यांच्या तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन स्पर्धेत प्रथम पारितोषिक युवा नेते बाळासाहेब यशवंत गव्हाणे यांचा तर्फे 51,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असुन द्वितीय पारितोषिक बाळासाहेब यशवंत गव्हाणे 31,000 रुपये तसेच तृतीय पारितोषक 21,000 हजार रूपये तसेच चतुर्थ पारितोषक युवा नेते बाळासाहेब गव्हाणे 11,000 हजार रूपये यांचा कडुन देण्यात आले.असुन वैयक्तिक बक्षीसे ही मान्यवरांकडुन देण्यात आलेली आहेत.
तसेच क्रिकेटचे साहित्य माजी पोलीस अधिकारी नानासाहेब शेंडगे व टी शर्ट सायाळे येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच विकास शेंडगे यांनी दिले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमास गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे तसेच कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक अण्णा रोहमारे,गोदावरी दुध संघाचे संचालक जिजाबापु गव्हाणे,युवा नेते बाळासाहेब यशवंत गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद गाढे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहणे,ढेपे साहेब ,सरपंच गोपीनाथ रहाणे,सरपंच विकास शेंडगे, सरपंच विक्रम पाचोरे,प्रथम लोकनियुक्त सरपंच माणिक दिघे,गजानन मते ,उपसरपंच आनंदा भडांगे, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर भाई, गणीभाई सय्यद,सरपंच बाबुराव थोरात, कज.के.बी.रोहमारे महाविद्यालयाचे संचालक लक्ष्मण दादा थोरात,बाबासाहेब गव्हाणे, बळीराम गव्हाणे, साहेबराव गव्हाणे, कैलास गव्हाने ,ज्ञानेश्वर गव्हाणे उर्फ बडे भाई, सदस्य विवेक गव्हाणे,मिनाथ भाऊ हेंगडे,विजय गव्हाणे, पोलीस पाटील सुधीर थोरात, युवा नेते जालिंदर पोकळे , राहुल नेहे,समीर लभडे,संतोष गव्हाणे, सागर गाडे,दिपक कोटकर,सदस्य तुकाराम गव्हाणे, संदीप गव्हाणे, सोपान गव्हाणे, ढेपे ज्ञानदेव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक घुलेवाडी येथील वसीम 11 यांनी तर द्वितीय पारितोषिक निफाड येथील सागर 11तसेच तृतीय पारितोषिक गणेश नगर 11 तसेच चतुर्थ पारितोषिक साई 11 यांनी पटकविले.तसेच मँन ऑफ दि मँच,बेस्ट बॉलर,बेस्ट बँटमँन,बेस्ट फिल्डर,बेस्ट किपर,बेस्ट कँच असे विविध वैयक्तिक बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष रहाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब चिमण रहाणे यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जवळके, अंजनापुर,धोंडेवाडी, बहादरपुर, बहादरबाद, वेस सोयगाव, सायाळे, राजणगाव देशमुख आदी परिसरातील खेळाडूंनी परिश्रम घेतले