ब्रेकिंग

गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

२० कंपन्या, ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; मुलाखती व निवड पत्रांचे वितरण

कोपरगांव । प्रतिनिधी । ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना एकाच छताखाली रोजगाराच्या व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ मंगळवार (दि.२९) रोजी गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, कोळपेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

मेळाव्याचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुनील बोरा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सोसायटीचे विश्वस्त मुस्ताक पटेल, अहिल्यानगर रोजगार महाकुंभ समन्वयक परितोष दरपेल, संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वसीम शेख, कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे, न्यू इंग्लिश स्कूल देर्डे प्राचार्य प्रकाश देशमुख, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.रोजगार मेळाव्यात राज्यासह देशातील २० हून अधिक नामांकित कंपन्यांसह १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा तसेच सर्व शाखांतील पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये व क्षमतांच्या आधारे मुलाखती घेतल्या. पात्र विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीसह अ‍ॅप्रेंटिसशिपच्या संधी देखील मिळाल्या आहे.ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला नवी सुरुवात करून देण्यासाठी हा रोजगार महाकुंभ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना विविध उद्योग व कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची, प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव घेण्याची तसेच आपल्या कौशल्यांना अनुरूप रोजगाराच्या संधी जाणून घेण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना एकाच छताखाली रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या असून उमेदवारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे सर्व मान्यवर, कंपन्यांचे प्रतिनिधी, अहिल्यानगर रोजगार महाकुंभचे पदाधिकारी, संस्थेचे अधिकारी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!