कोपरगावात शनिवारी दुष्काळी परिस्थितीवर विचारमंथन; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

कोपरगावात शनिवारी दुष्काळी परिस्थितीवर विचारमंथन; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांशी साधणार संवाद


कोपरगावात शनिवारी दुष्काळी परिस्थितीवर विचारमंथन; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांशी साधणार संवाद
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) दुपारी २.३० वाजता कोपरगाव येथे दुष्काळी परिस्थितीवर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार आहे.
कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे शनिवारी दुपारी २.३० वाजता ही बैठक होणार असून, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या चर्चेकडे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीन, मका यांसह विविध पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची झालेली हानी, पाण्याची उपलब्धता, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच आगामी काळातील शेतीविषयक अडचणी यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहून आपल्या समस्या, अडचणी आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहन गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश नामदेवराव परजणे पाटील यांनी केले आहे.कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे शनिवारी दुपारी २.३० वाजता ही बैठक होणार असून, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या चर्चेकडे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.



