ब्रेकिंग

एआय युगातही कष्टकरी श्रमिकांना कायम मोठी संधी राहणार – मा. शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

एआय युगातही कष्टकरी श्रमिकांना कायम मोठी संधी राहणार – मा. शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

जाहिरात मो-7756045359
जयहिंद लोकचळवळ व मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून 285 नागरिकांना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र
 
संगमनेर । प्रतिनिधी । विविध कौशल्यांचे पूर्ण ज्ञान व अनुभव असूनही सर्टिफिकेट अभावी अनेकांना कर्ज व इतर सुविधा मिळत नव्हत्या. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून अशा व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कौशल्य प्रमाणपत्र दिल्याने आता त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळणार आहे. एआय यूगातही कष्टकरी व श्रमिकांना कायमच मोठी संधी राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री तथा अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलगुरू लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाच्या के.बी. दादा सभागृहामध्ये जयहिंद लोकचळवळ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी विभागाचे सचिव प्रा. डॉ प्रकाश देशमुख, पूर्व शिक्षण मूल्यांकन केंद्राचे संचालक प्रा. डॉ राम ठाकर, सौ दुर्गाताई तांबे, आरपीएल सल्लागार आतीक शेख, समन्वयक उबेद शेख, प्रा. बाबा खरात डॉ. नामदेवराव गुंजाळ, प्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ, डी.एम. लांडगे, विजय राहणे दिलीप नागरे, जुनिअर कॉलेजचे प्राचार्य एस एम खेमनर, सौ प्रमिला अभंग, ॲड अनंत शिंदे, सौ सुनीता कांदळकर, सौ प्रतिभा माडकर, अंजुम बागवान , हर्षल थेटे, सुरज कर्डिले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मुक्त विद्यापीठाचे प्रशिक्षण कोर्स पूर्ण करून राजापूर शासकीय आयटीआय येथून परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या 285 व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यामध्ये कोपरगाव येथील मेकॅनिक मधील 111 प्रशिक्षणार्थी संगमनेर मधील टेलरिंग विभागातून 96 प्रशिक्षणार्थी कॉस्मेटिक मधून 13 प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिशियन मधून 27 वेल्डर मधून 25 प्लंबर मधून सहा असे एकूण 285 व्यक्तींना विद्यापीठाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की मुक्त विद्यापीठ ही संकल्पना फार सुंदर आहे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या अनेकांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी यामधून मिळते आहे अनेक लोक पदवीधर झालेले आहेत. याचबरोबर जे कष्ट करतात काम करतात शिक्षणापासून दूर आहे त्यांना ही प्रमाणपत्र देऊन त्यांच्या श्रमाला आणि कामाला प्रतिष्ठा देण्याचे काम मुक्त विद्यापीठाने केले आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा जमाना आहे अशा काळातही कष्टकरी व श्रमिकांना मोठी किंमत असून ती पुढेही राहणार आहे. या सर्व नागरिकांना अमृतवाहिनी इंजिनिअरिंग पॉलीटेक्निक आयटीआयच्या माध्यमातून अधिक नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी काम व्हावे असे ते म्हणाले.तर मा आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, बुद्धिमत्ता ही निसर्ग दत्त व अलौकिक देणगी आहे जी मानवाबरोबर प्राणीमात्रांमध्येही आहे. कौशल्यांचा सन्मान झाला पाहिजे याकरता हा उपक्रम राबविण्यात आला असून संशोधनामुळे देशाचा फायदा होतो. मुक्त विद्यापीठाने सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असून येत्या काळात स्टार्टअप, आर्थिक साक्षरता व ॲडव्हान्स ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्यात येतील असे ते म्हणाले. प्रा. डॉ प्रकाश देशमुख म्हणाले की समाजाच्या विकासाकरता समता प्रस्थापित होणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्याने कायम समतेचा विचार पुढे नेले असून गोरगरिबांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी काम केले आहे. येथे तुमच्या कौशल्यला मान मिळत असून माणुसकीच्या धर्माची पूजा संगमनेर मध्ये केली जात आहे .सर्वांनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी  उबेद शेख, अतीक शेख, सलीम रिलायन्स, शितल उगलमुगले, संदीप मोकळ ,शितल कानवडे, यांनीही मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्व शिक्षण मूल्यांकन विभागाचे संचालक प्राध्यापक डॉ. राम ठाकर यांनी केले सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी आभार मानले. याप्रसंगी कोपरगाव संगमनेर मधील प्रशिक्षण आरती मोठ्या संख्येने हजर होते.

 

शेती मातीशी नाती सांगणारा कलावंत हरपला–माजी मंत्री बाळासाहेब थोरात



हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना या कार्यक्रमात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आठवणी सांगताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नाना आणि आम्ही तीन कार्यक्रमांमध्ये बरोबर होतो. दमदार अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. आज रिल्स जरी असल्या तरी त्यांचे रोखठोक संवाद प्रत्येकाचे पाठ आहेत. याचबरोबर कायम शेती, दुष्काळी माणूस यांच्या बद्दल ते चर्चा करायचे. अभिनयाबरोबर सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान राहिले असून शेतीमातीशी नाते सांगणारे पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!