ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी संदीप दरेकर यांची बिनविरोध निवड!

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी संदीप दरेकर यांची बिनविरोध निवड!

जाहिरात -7756405359

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

कोपरगाव । प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी संदीप सूर्यभान दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कोपरगाव तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सहकारी व हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संदीप दरेकर यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संघटनेच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न सोडविणे, त्यांच्या अडचणी शासनदरबारी मांडणे, संघटनेची एकजूट अधिक मजबूत करणे तसेच संघटनेचा मान-सन्मान वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संदीप दरेकर यांनी सर्व सहकारी, वरिष्ठ पदाधिकारी आणि हितचिंतकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हे पद केवळ वैयक्तिक सन्मान नसून संघटनेतील सर्वांच्या विश्वासाची आणि सहकार्याची जबाबदारी आहे. सर्वांना सोबत घेऊन संघटनेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे आणि संघटनेची एकजूट अधिक बळकट करणे, हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी व्यक्त केले. संदीप दरेकर यांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!