ब्रेकिंग

बुधवार 14 ऑक्टो रोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

बुधवार 14 ऑक्टो रोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

जाहिरात -7756405359
बुधवार 14 ऑक्टो रोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

संगमनेर । प्रतिनिधी । देशातील सहकारासाठी दीपस्तंभ असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांच्या शुभहस्ते तर मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की या वर्षीचा गळीत हंगाम हा कारखान्याचा 60 वा गणित हंगाम आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम ऊस उत्पादक शेतकरी कामगार यांचे हित जोपासले आहे. कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. सातत्याने चांगला भाव दिला आहे. सन 2026 27 या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9 वा. होणार आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, डॉ जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, डॉ मैथिलीताई तांबे,संपतराव डोंगरे ,सुधाकर जोशी, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे ,सोमेश्वर दिवटे, नूर मोहम्मद शेख, सौ अर्चना बालोडे, लक्ष्मणराव कुटे, राजेंद्र चकोर, राजेंद्र कडलक, राजेंद्र गुंजाळ, प्रा बाबा खरात, गणपतराव सांगळे ,रामदास वाघ, इंद्रजीत भाऊ थोरात, शरद नाना थोरात,सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे ,हैदर अली, अमोल शेलकर, यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या गळीत हंगामासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!