ब्रेकिंग

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या

जाहिरात -7756405359

आ.आशुतोष काळेंचे जलसंपदा मंत्री ना.विखे पाटलांना साकडे

कोपरगांव । प्रतिनिधी । चालू वर्षी राज्यासह कोपरगाव मतदारसंघात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून संपूर्ण परिसराला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.परंतु धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे भरलेली आहेत हि काहीशी दिलासादायक बाब आहे.त्यामुळे जरी खरीप हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून गेला असला तरी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या चिंता सतावत आहेत. गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता गोदावरी कालव्यातून किती आवर्तन, कधी मिळणार याची माहिती लाभधारक शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घ्यावी असे साकडे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांना दिलेल्या निवेदनात घातले आहे.दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की,एल निनोच्या प्रभावामुळे राज्यासह संपूर्ण कोपरगाव मतदार संघात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे जरी धरणे भरलेली असले तरी शिल्लक पाणी पुढील वर्षी पाऊस सुरु होईपर्यंत पुरवण्याचे मोठ आव्हान आहे. अशा परिस्थितीत वाढत असलेली उष्णता त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन पाहता धरणात किती पाणी शिल्लक राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी किती आवर्तन कधी मिळणार याकडे लाभधारक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.आर्थिक अडचणी असतांनाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके उभी केली होती परंतु पुन्हा एकदा लहरी हवामानाचे बळी शेतकरी ठरले आहेत. त्यामुळे खरीप हंगाम जरी हातातून गेला तरी रब्बी हंगामातून काही तरी पदरात पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांना गोदावरी कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन कसे असेल याची अचूक माहिती होणे आवश्यक आहे.जेणेकरून उपलब्ध पाण्याचा विचार करून त्यांना पिकांची निवड करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेणेबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करावे असे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

जलसंपदा विभागाकडून १५ऑक्टोबरला धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण उपयुक्त जलसाठ्याची अंतिम आकडेवारी निश्चित केली जाते. याच साठ्याच्या आधारे पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन केले जाते.धरणात उपलब्ध असणारा पाणी साठा आणि त्याचे नियोजन सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक महत्वाचे माध्यम आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमुळे लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची नेमकी माहिती मिळणार असून त्यानुसार शेतकरी आपल्या शेतात कोणती पिके घ्यावीत याचे योग्य नियोजन करू शकणार आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेणे गरजेचे आहे.-आमदार आशुतोष काळे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!