ब्रेकिंग

पुणतांब्यात बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण; डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते उपक्रम

पुणतांब्यात बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण; डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते उपक्रम

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा

पुणतांबा । प्रतिनिधी । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पुणतांबा येथे बांधकाम कामगार कौशल्य विकास वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे कौशल्य अधिक विकसित व्हावे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच त्यांच्या कामाला अधिक व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हावे, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कामगारांना प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांच्या कौशल्याला अधिकृत मान्यता मिळण्यास मदत होणार आहे.दरम्यान, डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून साजरा न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचा हात देत हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, नागरिक तसेच बांधकाम कामगार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौशल्य विकासाला प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत अशा दुहेरी सामाजिक उपक्रमातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!