ब्रेकिंग
दिव्यांगांना स्वस्त धान्य वितरणात प्रथम प्राधान्य द्या; आ. आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

दिव्यांगांना स्वस्त धान्य वितरणात प्रथम प्राधान्य द्या; आ. आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना


दिव्यांगांना स्वस्त धान्य वितरणात प्रथम प्राधान्य द्या; आ. आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करताना दिव्यांग लाभार्थ्यांना इतर लाभार्थ्यांप्रमाणे रांगेत उभे राहावे लागते. शारीरिक अडचणींमुळे दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे राहणे त्रासदायक आणि गैरसोयीचे असल्याने दिव्यांग व्यक्ती धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात आल्यास त्यांना रांगेत उभे न करता त्यांना प्रथम धान्य वितरण करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत.

शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून दरमहा धान्य वितरण होत असताना दिव्यांग व्यक्तींनाही इतर लाभार्थ्यांप्रमाणे बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. शारीरिक अडचणींमुळे दिव्यांग व्यक्तींना जास्त वेळ उभे राहणे शारीरिकदृष्ट्या त्रासदायक असूनही नाईलाजाने त्रास सहन करून त्यांना इतर लाभार्थ्यांप्रमाणे रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची आमदार आशुतोष काळे यांनी दखल घेवून यापुढे दिव्यांग लाभार्थी स्वतः धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात दुकानात आल्यास त्यांना कोणतीही प्रतीक्षा न करायला लावता त्यांना प्रथम धान्याचे वितरण करावे.दिव्यांग लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना सहकार्य करावे. या सूचनांची सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. यामुळे वर्षानुवर्ष रांगेत उभ्या राहणाऱ्या दिव्यांग बंधू-भगिनींना यापुढे स्वस्त धान्य दुकानांतील रांगेत उभे राहावे लागणार नाही.आ.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या या संवेदनशील भूमिकेबद्दल मतदार संघातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी समाधान व्यक्त केले असून आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.



