ब्रेकिंग

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून जल संपदाच्या यांत्रिकी विभागाकडून हिंगणी बंधाऱ्यासाठी १०० लोखंडी प्लेट्स

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून जल संपदाच्या यांत्रिकी विभागाकडून हिंगणी बंधाऱ्यासाठी १०० लोखंडी प्लेट्स

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून जल संपदाच्या यांत्रिकी विभागाकडून हिंगणी बंधाऱ्यासाठी १०० लोखंडी प्लेट्स

कोपरगांव । प्रतिनिधी । आ. आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेट्ससाठी महायुती शासनाने ७.२९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये माहेगाव देशमुख येथील बंधाऱ्यासाठी १ कोटी ४० लाख, हिंगणी बंधारा १ कोटी १० लाख, डाऊच ९० लाख, सडे ३४ लाख, शिंगवे ४५ लाख, पुणतांबा ५० लाख, वडगाव कानळद १ कोटी २० लाख तसेच निफाड तालुक्यातील येथील खेडलेझुंगे बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ४० लाख असा एकूण ७.२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या व्यतिरिक्त जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाने आ. आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार तातडीने पाण्याची गळती रोखण्यासाठी हिंगणी बंधाऱ्याला १०० लोखंडी प्लेट्स उपलब्ध करून दिल्या आहे.

हिंगणी बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेट्स जुन्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होवून पाण्याचा अपव्यय होत होता. चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाले असल्याने बंधाऱ्यातील पाण्याची अजिबात गळती होऊ नये याची वेळीच खबरदारी घेवून आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाकडे नवीन प्लेटची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाने हिंगणी बंधाऱ्यांसाठी १०० नवीन लोखंडी प्लेट दिल्या आहे. या नवीन प्लेट्समुळे बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबली जाऊन जास्तीत जास्त पाणी शेती आणि जनावरांसाठी साठवले जाणार आहे. बंधाऱ्यात पाणी साठल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याबरोबरच भूजल पातळी वाढण्यास देखील मोठी मदत होईल. यामुळे हिंगणी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तातडीने प्लेट उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीम.सुनेत्राताई पवार,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!