ब्रेकिंग

दुष्काळी गावांच्या जलसाठ्यांना निळवंडेच्या आवर्तनाचा आधार!

सर्व तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे आ. आशुतोष काळेंचे निर्देश

दुष्काळी गावांच्या जलसाठ्यांना निळवंडेच्या आवर्तनाचा आधार!

सर्व तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे आ. आशुतोष काळेंचे निर्देश

कोपरगांव । प्रतिनिधी । यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समयसूचकतेतून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा लाभ कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जिरायती गावांसह संपूर्ण लाभक्षेत्रातील नागरिकांना देवून तळेगाव शाखा कालव्यातून सर्व साठवण तलाव, गाव तलाव, बंधारे व ओढे पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

कोपरगाव मतदारसंघातील जिरायती गावांसाठी निळवंडे कालवे जलदूत ठरले आहेत. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीने शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा परिस्थितीत निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यांना आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.सध्या सोडण्यात आलेल्या आवर्तनातील पाण्याचा जास्तीत जास्त लाभ दुष्काळग्रस्त गावांना मिळावा, या उद्देशाने आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला विशेष सूचना केल्या आहेत. मतदारसंघातील जिरायती गावांसह संपूर्ण लाभक्षेत्रातील साठवण तलाव, गाव तलाव, बंधारे आणि ओढे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावेत. त्यामुळे पुढील आवर्तन येईपर्यंत ग्रामस्थ आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राहण्यास मदत होईल. तसेच निळवंडे वितरिका पाईपलाईनचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून आवर्तनातून व्हॉल्व्हद्वारे पाणी देता येऊन लाभक्षेत्रातील गावांपर्यंत पाणी जलदगतीने पोहोचविणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता महेश गायकवाड यांनी सांगितले आहे की, निळवंडे कालव्यांचे आवर्तन सोडण्यात आले असून तळेगाव ब्रांचला २१ किंवा २२ तारखेला पाणी सोडण्यात येणार असून सुरू असलेल्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील सर्व साठवण तलाव, गाव तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्याची ग्वाही दिली आहे. तसेच उपअभियंता आसिफ शेख यांनी निळवंडे वितरिका पाईपलाईनचे उर्वरित कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!