शुक्रवारी (दि.२० नोव्हें) संत नामदेव अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन

शुक्रवारी (दि.२० नोव्हें) संत नामदेव अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांची उपस्थिती

याबाबत अधिक माहिती देताना संत साहित्याचे अभ्यासक प्रा.विठ्ठल शेवाळे म्हणाले की, समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारी मोठी संत आणि समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे या संत परंपरेतील पहिले संत शिरोमणी म्हणून संत नामदेव महाराज आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी हा अभंग प्रत्येकाच्या मुखात आहे. समाजामध्ये संतांनी सांगितलेला उपदेश आणि त्यांची अभंगवाणी पुढे जावी याकरता जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून शबद कीर्तन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमांमधून संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विविध अभंगांचे गायन व त्याचे विवेचन होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमात ह भ प प्राध्यापक विनोद राऊत व त्यांचा समूह तर इकबालसिंग बत्रा व विद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा अभंगांचे गायन करणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विठ्ठल शेवाळे करणार आहेत.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता या शबदकिर्तन सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा हा सुंदर कार्यक्रम होणार आहे.तरी या अभंगवाणी कार्यक्रमासाठी संगमनेर तालुका व शहर मधील सर्व वारकरी विचारांचे पाईक, वारकरी मंडळी, साहित्याचे अभ्यासक, नागरिक बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय हिंद लोकचळवळ व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



