ब्रेकिंग

निळवंडेच्या वितरिका क्र. ४ व टेल राईटचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करा; आ. आशुतोष काळेंच्या सूचना

निळवंडेच्या वितरिका क्र. ४ व टेल राईटचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करा; आ. आशुतोष काळेंच्या सूचना

निळवंडेच्या वितरिका क्र. ४ व टेल राईटचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करा; आ. आशुतोष काळेंच्या सूचना

कोपरगांव । प्रतिनिधी । निळवंडे कालव्याच्या पाण्याचा परिसरातील बंधारे व पाझर तलाव भरण्यासाठी प्रभावी वापर व्हावा, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने मंगळवार (दि.१७) रोजी त्यांनी निळवंडे कालव्याच्या वितरिका क्र.४ च्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून निळवंडे कालवा ते मंगलमूर्ती लॉन्स या मार्गावरील व टेल राईट वितरिका खोकड विहीर पॉईंटचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत.

निळवंडे कालव्यातून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील बंधारे आणि पाझर तलाव भरता यावेत, यासाठी मंगलमूर्ती लॉन्स येथे व्हॉल्व्ह बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार वितरिका क्र. ४ वर मंगलमूर्ती लॉन्स येथे व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण झाले असून कालव्याच्या जोडणीचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.परंतु एका ठिकाणी डाळिंबाची बाग असलेल्या शेतातून पाईपलाइन टाकण्याचे काम अद्याप बाकी आहे. संबंधित शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन हे काम विनाविलंब पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या. तसेच टेल राईट वितरिकेतून खोकड विहीर पॉईंट येथे २०० मीटर पाईपलाइन टाकून व्हॉल्व्ह बसविण्याचे कामही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.या कामामुळे परिसरातील बंधारे व पाझर तलावांमध्ये निळवंडे कालव्याचे पाणी सोडण्याचा मार्ग सुकर होणार असून, त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. यावेळी कृषी विभागाच्या सायली बेंडकुळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!