ब्रेकिंग

नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी ‘रक्षक दल’ सज्ज!

नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी ‘रक्षक दल’ सज्ज!

शहराच्या सुरक्षेसाठी अखंड पहारा; आपत्कालीन मदतीसाठी ९०६७२ ७३२७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

संगमनेर । प्रतिनिधी । शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संगमनेर नगरपरिषदेने ‘रक्षक दल’ ही सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रक्षक दल २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

शहरात नागरिकांना विविध कारणांमुळे उद्भवणाऱ्या सुरक्षा विषयक अडचणी, आपत्कालीन प्रसंग किंवा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास रक्षक दलाशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी नगरपरिषदेने ९०६७२ ७३२७३ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही नागरिकांना संपर्क साधण्याची सुविधा देण्यात आली आहे.शहरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात काही अनुचित प्रकार किंवा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब निदर्शनास आल्यास तातडीने रक्षक दलाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरक्षा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेने सुरू केलेला हा उपक्रम शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.‘शहराच्या सुरक्षेसाठी अखंड पहारा’ हा संदेश देत संगमनेर नगरपरिषदेचे रक्षक दल नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास तत्पर आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!