ब्रेकिंग
मानवतेची शिकवण देणारी संत साहित्याची मोठी देण – मा. मंत्री बाळासाहेब थोरात

जयहिंद लोकचळवळ व थोरात संगीत महाविद्यालयाचा अभंगवाणी कार्यक्रम
संगमनेर । प्रतिनिधी । तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा, कैसे मन करेगा रे, नामदेव कीर्तन करी प्रेम भरे नाचे पांडुरंग यांसह संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विविध अभंगांनी संगमनेरकरांना भक्तीरसाने मंत्रमुग्ध केले. हा मानवतेचा व समतेचा विचार ही संत साहित्याची मोठी समृद्ध संपदा असून संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा विचार उत्तर भारतापर्यंत पोहोचवला. संत नामदेवांसह सर्व संतांनी दिलेला मानवतेचा विचार सर्वांनी जपावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान जयहिंद लोकचळवळ व थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित अभंगवाणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थापक मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, रामहरी कातोरे, प्रा.बाबा खरात, नामदेव गुंजाळ, अनंत शिंदे,प्रा विश्वनाथ भुजबळ, प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, बाळकृष्ण महाराज करपे, अरुण महाराज फरगडे, किसन भाऊ हासे, केशवराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेवांच्या विठ्ठल विठ्ठल या अभंगांनी झाली. खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे या अभंगाला समूहाने मोठी दाद दिली. तर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी हा ह.भ.प.विनोद राऊत यांनी गायलेला अभंगाला टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नामाचा गजर गरजे भीमा तीर, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल यांसह नामदेव महाराजांच्या विविध अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला.संत साहित्याचे अभ्यासक प्रा.विठ्ठल शेवाळे यांनी प्रत्येक अभंगाचे अभ्यासपूर्ण केलेले निरूपण लक्षवेधी ठरले. संत परंपरेची मोठी समृद्ध माहिती त्यांनी यावेळी दिली याचबरोबर नामदेव महाराजांनी अठरा वर्ष पंजाब मध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार केला असून पंजाब प्रांतामध्ये त्यांचा मोठा आदर असल्याचे सांगितले यावेळी इकबाल सिंग बत्रा यांनी कैसे मन तरी गारे याच्यासह विविध हिंदी अभंग गायले. मराठी आणि हिंदी अभंगांचा मिलाफ ही सुंदर संस्कृती संगमनेरच्या भाविकांना अनुभवायला मिळाली.यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी समृद्ध संत परंपरा लाभली आहे. संतांची मोठी वैचारिक देण असलेली संपत्ती आपल्याकडे आहे. समतेचा आणि मानवतेचा मंत्र त्यांनी आपल्याला सांगितला आहे. संत नामदेव महाराज यांनी महाराष्ट्र सह पंजाब प्रांत व उत्तर भारतामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार केला त्यांची 61 पदे गुरु ग्रंथ साहेबांमध्ये आहेत. त्यानंतर गुरुनानक आणि कबीर यांचा समकालीन कालखंड याच काळामध्ये महाराष्ट्रातही अनेक संतांनी समतेचा विचार पुढे नेला. सर्व संतांनी मानवता धर्म सांगितला आहे तो आपण सर्वांनी जोपासावा मात्र सध्या जातीपातीच्या नावावर मानवता धर्म संकटात आला आहे. हे दुर्दैवी असून आपण सर्वांनी संतांचा विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहू या असे ते म्हणाले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून संत साहित्याचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले जात आहे. संतांनी कधीही भेदभाव केला नाही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. समतेचा आणि मानवतेचा विचार दिला. चांगला समाज आणि चांगली पिढी घडवण्यासाठी हा संत विचार अत्यंत महत्त्वाचा असून या विचारांचा जागर युवकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी या भक्तिमय कार्यक्रमात अरविंदर सिंग पंजाबी, विशाल वाघमारे,प्रताप राऊत, गार्गी राऊत,अवधूत काळे, सौरभ रणधीर, अक्षय लोंढे, क्षितिज मुसळे यांनी संगीत साथ दिली. या कार्यक्रमाचे स्वागत सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले प्रास्ताविक प्रा.विठ्ठल शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर अनंत शिंदे यांनी आभार मानले.यावेळी संगमनेर मधील वारकरी संप्रदाय, विविध संघटना पदाधिकारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.