ब्रेकिंग

कोल्हे साहेबांची काम करण्याची हातोटी व प्रसंगी कठोरता आम्हाला जवळुन अनुभवता आली !! – जयराम सखाराम पाचोरे 

कोल्हे साहेबांची काम करण्याची हातोटी व प्रसंगी कठोरता आम्हाला जवळुन अनुभवता आली !! – जयराम सखाराम पाचोरे 

 

कोपरगांव । विनोद जवरे ।

कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते, सहकार,शेती व सिंचन विषयाचा गाढा अभ्यास असलेले, कोपरगाव तालुक्याचे संघर्षशील नेतृत्व माजी मंत्री स्व शंकररावजी कोल्हे साहेब यांच्यासमवेत सामाजिक कार्यात काम करत असतानाचे अनेक अनुभव गाठीशी आहेत.त्यातील एक अनुभव प्रकर्षाने विशद करावा वाटतो.


आमची बहादराबाद सह.पाणी उपसा सिंचन योजना राजकीय संघर्षामुळे अवसायानात निघाली.परंतु सदरची योजना शेतकरी हितासाठी कार्यान्वित करायचीच असा चंग मा.कोल्हे साहेबांनी बांधला.व त्यादृष्टीने तांत्रिक, आर्थिक सहाय्य देखील साहेबांनी केले. सदर योजना सुरू करण्यात मुळ अडसर होता भूविकास बँकेचे सात लाख रू.देणे व विजबिल दीड लाख रू.देणे.सदरची 8,50,000/= रू रक्कम मा.साहेबांनी भूविकास बँकेचे तत्कालीन चेअरमन श्री.गुरुनाथ टावरे यांच्याशी चर्चा करून सदर संस्थेस नविन कर्ज मंजुर करून उपलब्ध करण्यासाठी शिफारस केली.त्यावेळी बँकेच्या चेअरमन साहेबांनी संस्थेचे थकीत कर्ज व विजबिल भरा.व कर्ज मागणी प्रस्ताव सादर करा.मी संस्थेस 10,00,000/= (दहा लाख रू.) कर्ज उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिली.तेंव्हा मा.कोल्हे साहेबांनी शेतकर्यांची कर्जबाकी भरण्याची परिस्थिती नाही व बंद असलेल्या संस्थेची वसुली होणे अशक्य आहे.त्यामुळे मी संजिवनी कारखान्याच्या स्वनिधीतुन एक महिन्याकरिता ही रक्कम भरतो व परिपूर्ण प्रस्ताव आपल्या बँकेकडे सादर करतो,परंतु एक महिन्यात माझ्या कारखान्याचे पैसे मिळाले पाहिजेत. अशी कैफियत मा.टावरे साहेबांकडे मांडली.यावर टावरे साहेबांनी एक महिन्यात आमच्या उपसा सिंचन योजनेस कर्ज मंजुर करण्याचा मा कोल्हे साहेबांना शब्द दिला.
ठरल्याप्रमाणे मा.कोल्हे साहेबांनी संजिवनी कारखान्याकडुन भूविकास बँकेस 7,00,000/=रू.व विजबिल 1,50,000/=रू असे एकूण 8,50,000/= रू.उपलब्ध करून दिले.व आम्ही भूविकास बँकेस परिपूर्ण कर्ज मागणी प्रस्ताव एक महिन्याच्या आत सादर केला.परंतु मा कोल्हे साहेबांसमवेत सदर कर्ज प्रकरणासंदर्भात आम्ही मुंबईला भूविकास बँकेत तब्बल अठरा महिने पाच ते सहा चक्कर मारले परंतु प्रत्येक वेळी बँकेचे चेअरमन व व्यवस्थापक यांनी वेगवेगळ्या त्रुटी काढल्या.आम्ही सदरचे प्रकरण जानेवारी 1990 मध्ये सादर केले होते व जुन 1991 पर्यंत ही सदरची रक्कम आमच्या संस्थेस मिळाली नाही व त्यामुळे कारखान्याची रक्कम संस्थेकडे अडकली.दरम्यान च्या कालावधीत मा कोल्हे साहेबांच्या मदतीने आमची उपसासिंचन योजना सुरळीतपणे कार्यान्वित झाली.


साधारणतः जुन 1991 मध्ये मा.कोल्हे साहेबांबरोबर मी श्री.जयराम पाचोरे,श्री.उत्तमराव पाचोरे व श्री.साहेबराव पाचोरे आम्ही सर्व सहकारी भूविकास बँक प्रस्तावासंदर्भात मुंबई ला गेलो.आज या प्रकरणाचा निकाल लावायचाच अस साहेबांनी आम्हाला सांगितले.प्रथमतः मा साहेबांचे मंत्रालयातील कामे आटोपायची व नंतर भूविकास बँकेत जायचे अस ठरल.साधारणपणे दुपारी एक वाजता मंत्रालयातील कामे आटोपून आम्ही साहेबांसमवेत मंत्रालय आवारातुन बाहेर येत होतो, तेवढ्यात मला समोरून भूविकास बँकेचे चेअरमन श्री गुरुनाथ टावरे समोरून येताना दिसले व मी साहेबांना सांगितले टावरे साहेब समोरून येताहेत.मा.कोल्हे साहेबांनी चेअरमन टावरे साहेब जवळ येताच आपल्या उजव्या पायातील बुट काढून तसाच पायाने टावरे साहेबांकडे सरकवला व म्हटले “हे भल्या माणसा हा बुट घे व माझ्या डोक्यात मार” एक महिन्यात कर्ज मंजुर करतो म्हणाला तुझ्या शब्दाखातर मी कारखान्याकडुन पैसे उपलब्ध करून दिले.माझ्या कारखान्याचे पैसे अडकलेत व पाच-सहा हेलपाटे मारून ही अजुन ही तु थापा मारतोस…. साहेबांचा हा रुद्रावतार पाहुन चेअरमन टावरे साहेबांच अवसानच गळाल*.टावरे साहेब म्हटले साहेब माझ मंत्रालयातील काम रद्द करतो,चला बँकेत तुमचे काम मार्गी लावतो.मग आम्ही साहेबांबरोबर भूविकास बँकेत गेलो तेंव्हा टावरे साहेबांनी नाबार्ड ने जुन्या उपसा जलसिंचन योजनेंना कर्ज देणे बंद केलय.पण तुम्हाला नाही म्हणण्याची माझी हिंमत नाही मी बँकेच्या स्वनिधीतुन तुमचे प्रकरण आज मंजुर करतो असे म्हणत आम्हाला एका दिवसात प्रक्रिया करत संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आमच्या हातात कर्ज रकमेचा दहा लाख रू रकमेचा चेक दिला.
मा कोल्हे साहेबांची ही काम करण्याची हातोटी व प्रसंगी कठोरता आम्हाला जवळुन अनुभवता आली.असे हे कोपरगाव मतदारसंघाचे लोकनेते माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन….
“असे लोकनेते होणे नाही”कोल्हे साहेबांची काम करण्याची हातोटी व प्रसंगी कठोरता आम्हाला जवळुन अनुभवता आली !! – जयराम सखाराम पाचोरे

       आपले नम्र
श्री जयराम सखाराम पा.पाचोरे
मु.बहादराबाद ता. कोपरगाव

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!