ब्रेकिंग

थोरात कारखान्याकडून 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

थोरात कारखान्याकडून 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

संगमनेर । विनोद जवरे ।

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवरील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन 2022- 23 या  हंगामात 10 लाख मे. टन ऊस गाळपचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

कारखान्यातील चालू हंगामातील ऊस गाळपाबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, मागील वर्षी व यावर्षी कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्रात बाहेर पाऊस चांगला झाल्याने कारखान्याने मागील वर्षाच्या हंगामात 15 लाख 53 हजार मे टनाचे उच्चांकी गाळप केले होते. तर यावर्षी सन 2022- 23 या  हंगामात आतापर्यंत 10 लाख मे. टनाचे ऊस गाळप केले आहे.
कारखान्याने कार्यक्षमता व अचूकता कायम राखताना सभासद, शेतकरी ,ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहे .कारखान्याच्या चांगल्या कामाबद्दल कारखान्याला राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा विविध पुरस्कारांनी गौरवले गेले आहे.यावर्षी कार्यक्षेत्रात व बाहेरील उसाचे गाळपही मोठ्या प्रमाणात झाले असून येत्या 30 मार्च 2023 पर्यंत कारखान्याचे सर्व ऊस गाळप पूर्ण होऊन गळीत हंगामाची सांगता होणार आहे.

कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीत मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे व सर्व संचालक मंडळ, इंद्रजीत भाऊ थोरात, यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्हटले आहे..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!