ब्रेकिंग

नेत्याच्या फोटोला चपलांनी मारण्याचा प्रकार विकृत, निंदनीय व लोकशाहीस मारक. – आमदार बाळासाहेब थोरात

नेत्याच्या फोटोला चपलांनी मारण्याचा प्रकार विकृत, निंदनीय व लोकशाहीस मारक. – आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर । विनोद जवरे ।

विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

     यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेच्या परिसरात राहुल गांधींच्या बॅनरबाबत जी विकृत घटना घडली ती विधानसभेच्या इतिहासातील एक निंदनीय व दुर्दैवी घटना आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचेबाबत हा प्रकार घडला आहे मात्र हे लक्षात ठेवावे की, आज आमच्या वरीष्ठ नेत्यांबाबत हे घडले. तुमच्याकडेही वरीष्ठ नेते आहेत, आपल्या नेत्यांबाबत असे घडू शकतात याची जाण असली पाहिजे. म्हणून विधानसभा अध्यक्षांनी दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. असे जर झाले नाही तर तुमच्या कार्यकाळात अशा घटना घडूनही आपण कारवाई केली नाही हे इतिहासात काळ्या अक्षरात लिहिले जाईल. आता आम्हाला आपल्याकडूनच न्याय व योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे. याबाबतीत आपणांस वारंवार भेटून व मागणी करुनही कोणताही निर्णय घेतला नाही हे चुकीचे आहे. या विकृत घटनेबाबत जर निर्णय झाला नाही तर, ही कृती दुसऱ्याही राजकीय नेत्यांच्या बाबतीत होवू शकते हे लक्षात घ्यावे आणि ते दुर्दैवी ठरू शकते म्हणून याबाबतीत आपण निर्णय घ्यावा जो पुढील काळासाठी व लोकशाही प्रणालीसाठी महत्वाचा आहे.
     राज्यात आज जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. अवकाळी पाऊस, पीकांचे बाजारभाव यासारखी अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर असून या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी व तातडीने मदत मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येते. विरोधीपक्ष जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम या आंदोलनातून करत असतो. आज आम्ही आंदोलने करीत आहोत, यापूर्वी आपणही अशा प्रकारची आंदोलने केली आहेत, त्यात काहीही चुकीचे नाही. विरोधकांना पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याचा अधिकार आहे, लोकशाही प्रणालीने हा अधिकार दिलेला आहे. पण दोन दिवसापूर्वी झालेला प्रकार अयोग्य आहे तो पुन्हा होऊ नये यासाठी कारवाई करुन एक संदेश देण्याची आवश्यकता आहे, असेही थोरात म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!