ब्रेकिंग

शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडवा – आमदार बाळासाहेब थोरात

नगर मनमाड खड्ड्यांचा रस्ता का होत नाही

शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडवा – आमदार बाळासाहेब थोरात

नगर मनमाड खड्ड्यांचा रस्ता का होत नाही

कोपरगांव । विनोद जवरे ।

सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी सह लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले. भाजपची कार्यपद्धती ही जनतेला मान्य नसून खड्ड्यांचा रस्ता म्हणून मृत्यू सापळा बनलेला नगर मनमाड रस्ता वर्षानुवर्ष सत्ता असून का होत नाही असा सवाल करतानाच शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उघडवा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे

राहता येथील घोलप मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  पंकज लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मस्के ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे ,मुजीब भाई शेख, महेंद्र शेळके, अनिल भांगरे, तालुकाप्रमुख सचिन कोते, रावसाहेब बोठे डॉ एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, सुरेश थोरात ,श्रीकांत मापारी, सौ प्रभावती  घोगरे ,जनार्दन घोगरे, विक्रांत दंडवते ,समीर दंडवते, समीर करमासे, नंदकुमार सदाफळ, अण्णा कोते ,महेंद्र शेळके ,सुभाष निर्मळ, अरुण पा. कडू, प्रवक्ते ताराचंद म्हस्के, सौ शीतल लहारे ,मामा पगारे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अत्यंत सहज पद्धतीने शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली. कोरोना काळात या सरकारने चांगल्या काम केल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. मात्र मागील नऊ महिन्यापासून आलेल्या सरकारने एकमेकांवर केलेले आरोप, त्यांच्या वागण्याची पद्धती हे पाहता राजकारणाचा पोत सध्या रसातळाला गेला आहे .सुप्रीम कोर्टातून नक्की न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्याच क्षणाला राज्यातील सरकार कोसळेल. कारण भाजपची कार्यपद्धती जनतेला मान्य नाही.

 3560 किलोमीटर पदयात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या प्रश्नाला देशाचे पंतप्रधान उत्तर देत नाहीत. महागाई, बेरोजगारी वरून लक्ष हटवण्याकरता धार्मिक मध्ये पुढे केले जात आहेत. राज्यांमध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. राहता तालुका पूर्वी वैभवशाली तालुका होता 40 ट्रक पेरू या तालुक्यातून जात होते, ऊस, वाटपाणी अशी समृद्धी असलेल्या या तालुक्याचा विकास खुंटला आहे. इतकी वर्ष घरात सत्ता असताना नगर मनमाड रस्ता का होत नाही. यामुळे हा खड्ड्यांचा आणि मृत्यू सापळा असलेला रस्ता म्हणून राज्यात कुप्रसिद्ध झाला आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत. कधीही इतर तालुक्यांमध्ये ढवळाढवळ केली नाही. मात्र येथील दहशतीला लोक आता कंटाळले आहेत. सर्वांनी एकत्र येऊन सर्व निवडणुका लढवा. शिर्डी मतदार संघातील दहशतीचे झाकण जनतेच्या एकतीतून उडवायचे आहे.
 शेती महामंडळाचे साठ वर्ष सुरू असलेल्या लढा आपण महसूल मंत्री झाल्यानंतर तातडीने सोडवला. मात्र या प्रश्नाच्या संघर्षाला इतकी वर्ष का लागली हे ओळखा. याचे कारण म्हणजे जनतेला पिचवत ठेवण्याचे झुलवत ठेवायचे हे येथील राजकारण आहे. आपण सर्वसामान्य जनतेबरोबर असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मजबूतपणे एकत्र या असे आवाहन त्यांनी केले.तर आमदार डॉ तांबे म्हणाले की, सध्या देशात लोकशाहीची घसरण होते आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे .आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम  सुसंस्कृत राजकारण केले आहे. विचारांची बांधिलकी ठेवली आहे. पक्षनिष्ठा ठेवून काम केले आहे. सत्ता ही लोकांच्या प्रगतीसाठी असते .लोकांना त्रास देण्यासाठी नाही असा टोलाही त्यांनी लगावला तर भाऊसाहेब कांबळे म्हणाले की,  महाविकास आघाडी सरकारने विकास कामांसाठी दिलेल्या निधीचे उद्घाटन या सरकारमधील मंत्री करत आहेत.यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के, सौ प्रभावती  घोगरे, श्रीकांत मापारी, सचिन चौगुले ,सुधीर मस्के, प्रमोद लबडे, अशोक थोरे ,नानाभाऊ बावके, मनसेचे विजय मोगली ,धनंजय गाडेकर आदींची भाषणे झाली.याप्रसंगी गणपतराव सांगळे,  नवनाथ महाराज आंधळे, संदीप विघे, शिवाजी ठाकरे ,विक्रांत दंडवते, सचिन गाडेकर ,दीपक सोळंकी, अनिता काळे, एल एम डांगे सर आदींसह महाविकास आघाडीतील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एकनाथ गोंदकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे यांनी आभार मानले

 दिवाळी 2022 ला निळवंडे कालव्यांचे पाणी देण्यासाठी काम केले

 अनेक अडचणीवर मात करून आपण निळवंडे धरण पूर्ण केले. याचबरोबर कालव्यांच्या कामांसाठी मोठा निधी मिळवला. ऑक्टोबर 2022 मधील दिवाळीच्या पाडव्याला उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी आणण्यासाठी आपले उद्दिष्ट होते मात्र नवीन सरकार आले आणि सर्व कामे थांबले आहेत तरीही आपणच या कामांचा पाठपुरावा  करत असल्याचे आमदार थोरात यांनी सांगितले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!