ब्रेकिंग
एकविरामुळे मुलींना क्रिकेटसाठी मोठे व्यासपीठ- आमदार बाळासाहेब थोरात
एकविराच्या वतीने संगमनेरात महिला क्रिकेटचा थरार सुरू
एकविरामुळे मुलींना क्रिकेटसाठी मोठे व्यासपीठ- आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर । विनोद जवरे ।
महिलांनी विज्ञान ,कला ,क्रीडा, शिक्षण, संशोधन, समाजकारण, राजकारण, साहित्य यांसह प्रत्येक क्षेत्रात केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. क्रिकेटमध्ये भारतीय मुलींची कामगिरी ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत असून कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्या वतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेमधून मुलींसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशन च्या वतीने महिला क्रिकेट सह बॅडमिंटन, रस्सीखेच व कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी समवेत सौ कांचनताई थोरात ,नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे ,सौ अर्चनाताई बालोडे, सौ सुनंदाताई दिघे ,सुषमा भालेराव ,एकविराच्या डॉ वृषाली साबळे , सौ.ज्योती थोरात, शर्मिला हांडे, तृष्णा औटी, अहिल्या ओहोळ, शिवानी वाघ, किरण गुंजाळ, पूजा गाडेकर, सुरभी आसोपा, सुरभी मोरे ,मयुरी थोरात ,गायत्री थोरात, पूजा थोरात ,आदिती खोजे, अंबादास आडेप ,संदीप लोहे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, जयवंत अभंग, शेखर सोसे, प्राचार्य एम वाय दिघे ,डॉ सुनील सांगळे, अभिजीत बेंद्रे, सत्यजित थोरात , मिलिंद औटी आदींसह एकवीराच्या विविध महिला उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एक वेळा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील चार वर्षात महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत . महिलांच्या विविध स्पर्धा आयोजनात यावर्षी प्रथमच भव्य महिला क्रिकेटचा थरार संगमनेर मध्ये होणार आहे .यामध्ये संगमनेर ,अहमदनगर सह बाहेरून 48 संघांचा सहभाग हा आनंददायी आहे. महिलांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश आणि केलेली कामगिरी ही अभिमानास्पद असून क्रिकेटमध्ये ही मुलींना मोठी संधी आहे .या क्षेत्रामध्ये आता नव्याने करिअरच्या वाटा उपलब्ध झाल्या आहेत. एकविरा फाउंडेशनने सुरू केलेल्या या स्पर्धेचा ग्रामीण भागातील मुलींना नक्कीच लाभ होणार असून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोबाईल पेक्षा मैदानाकडे वळले पाहिजे.मैदानी खेळ हे आरोग्यासाठी चांगले असून क्रिकेट मधून सांघिक भावनेसह अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते.आगामी काळात ही स्पर्धा नक्कीच उत्तर महाराष्ट्राचे मोठे केंद्र ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.

नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असून संगमनेर शहर हे सांस्कृतिक व वैभवशाली शहर म्हणून राज्यात ओळखले जात आहे. एकविराच्या महिलांच्या क्रिकेट सामन्यांमधून महिला व विद्यार्थिनींनी घेतलेला मोठा उत्स्फूर्त सहभाग हा अत्यंत आनंददायी आहे .ही स्पर्धा राज्यभरातील मुलींसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होणार असल्याचे त्या म्हणाल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ वृषाली साबळे यांनी केले तर ज्योती थोरात यांनी आभार मानले.

क्रिकेटमध्ये 48 संघांचा सहभाग
अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच महिला क्रिकेटच्या स्पर्धा होत असून संगमनेर तालुक्यासह अहमदनगर, नाशिक ,पुणे इथूनही विविध क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. या सर्व संघांना टी-शर्ट , कॅप व कीट देण्यात आली असून अत्यंत अत्याधुनिक सुविधा, प्रेक्षकांसाठी गॅलरी, हिरवे मैदान आणि थेट लाईव्ह प्रक्षेपण यामुळे ही स्पर्धा रंगतदार ठरणार असून षटकारा चौकारांच्या वेळी ढोल ताशांच्या गजराने मैदान दुमदुमून जात आहे.