ब्रेकिंग

कारखाना व सहकारामुळे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात आनंद- आमदार बाळासाहेब थोरात

10 लाख मे. टन पेक्षा जास्त  गाळपाने यशस्वी सांगता

कारखाना व सहकारामुळे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात आनंद- आमदार बाळासाहेब थोरात


संगमनेर । विनोद जवरे ।
ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी देण्यासाठी निळवंडे कालव्यांचे काम रात्रंदिवस सुरू ठेवले. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणल्या तरी पाणी येणारच आहे. कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून तालुक्यातील सहकारी संस्था ,कारखाना यामुळे तालुक्यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते तर व्यासपीठावर मा. आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, बाजीराव पा.खेमनर, रणजीत सिंह देशमुख लहानुभाऊ गुंजाळ, आर.बी. राहणे ,मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे ,व्हाईस चेअरमन संतोष हासे, इंद्रजीत भाऊ थोरात, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे ,सौ अर्चनाताई बालोडे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सुनंदाताई जोर्वेकर ,घुलेवाडीच्या सरपंच सौ निर्मलाताई राऊत, नवनाथ आरगडे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. सहकारी संस्था आणि कारखान्यामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याने यावर्षी अनेक अडचणीवर मात करून 10 लाख मेट्रिक टनाचे वर यशस्वी गाळप केले आहे. मात्र कार्यक्षेत्रात एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढेल यासाठी काम केले पाहिजे.निळवंडे धरण अनेक अडचणीवर मात करून आपण पूर्ण केले. असून कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस कामे सुरू ठेवली होती .ऑक्टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी द्यायचे होते .परंतु सरकार बदलले आणि काम मंदावले .परंतु पाणी येणार आहे .शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

 सहकारी संस्थांमुळे तालुक्यात समृद्धी आली असून वैभवशाली व प्रगतशील तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा नंबर हा राज्यातील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये लागतो. सुसंस्कृत व बंधू भावाचे राजकारण ,ज्येष्ठांचा सन्मान हे आपल्या तालुक्याची परंपरा असून सर्वांनी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. संगमनेरचा सहकार, शिक्षण संस्था ,व्यापार ,शेती हे अत्यंत चांगले असून या चांगल्या कामाचा अभिमान बाळगताना सर्वांनी चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले

तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, बिनचूक आणि निर्मिग्नपणे कारखान्याचा यशस्वी  हंगाम पार पाडला आहे. यामध्ये कारखान्याच्या सर्व व्यवस्थापनाचा मोठा सहभाग असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे .सहकारातूनच समाजाचे हित होत असल्याने सहकार चळवळ प्रत्येकाने जपली पाहिजे असेही ते म्हणाले तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची यशस्वी वाटचाल सुरू असून  उपपदार्थ निर्मिती बरोबर आगामी काळात इथेनॉल निर्मितीमध्ये  साखर कारखान्याला मोठी संधी असल्याचे ते म्हणाले तर बाबा ओहोळ म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने 12.3 साखर उतारा मिळवला असून हे सर्वांचे एकत्रित यश असल्याचे सांगून संगमनेर तालुका हा विकासात पुढे असून काही विघ्न संतोषी त्यामध्ये अडथळे निर्माण करू पाहत आहे .त्यांना जनताच उत्तर देईल असेही ते म्हणाले. यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार , मिनानाथ वर्पे ,इंद्रजीत खेमनर ,संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे ,विनोद हासे, अनिल काळे ,माणिक यादव ,सौ मंदाताई वाघ ,रामदास वाघ, संभाजी वाघचौरे, सौ मीराताई शेटे , सुधाकर जोशी,सुधाकर रोहम, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन संतोष हासे  यांनी आभार मानले.

कामगारांना वेतन फरक 4 कोटी 21 लाख

थोरात कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, यांच्याबरोबर कामगारांचे हित जोपासताना अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले असून वेतन फरक 4 कोटी 21 लाख रुपये देण्याचा निर्णय आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर करतात सर्व कामगारांनी टाळ्यांचा कडकडाट केला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!