विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच इतर क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे- सिनेअभिनेत्री अंजली अत्रे
शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच इतर क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे- सिनेअभिनेत्री अंजली अत्रे
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक 27 रोजी आयोजित करण्यात आले होते या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सिने अभिनेत्री अंजलीताई अत्रे व पोहेगाव नागरी पतसंस्थेचे मार्गदर्शक नितीनराव औताडे व सरपंच योगिता घारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.
पुण्याच्या प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना घडवताना एक व्हिजन ठेवून घडवले गेले पाहिजे. इयत्ता चौथीच्या पुस्तकात त्यांचा मिठाचा शोध नावाचा जो धडा आहे तो लिहिताना त्यांनी आपल्या मुलीला कोणत्या कथा सांगितल्या पाहिजे आणि त्या शोध कथा असतील तर मुलगी नक्कीच सायंटिस्ट होईल. म्हणून त्यांनी मिठाचा शोध नावाचा पाठ लिहून विद्यार्थ्यांना विचार करण्याची शक्ती वाढवली आहे आजही त्यांची मुलगी सायंटिस्ट चा कोर्स करत आहे. याप्रसंगी पोहेगाव नागरी पतसंस्थेचे मार्गदर्शक नितीनराव औताडे म्हणाले की गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक पालकांनी शाळेसाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. गावातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी जसे आपण एकत्र येतो तसे शाळेच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे. याप्रसंगी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी माननीय शबाना शेख म्हणाल्या की आपल्या आईनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांचा एक तास अभ्यास घेतला पाहिजे टीव्ही सिरीयल कडं थोडं कमी लक्ष देऊन त्यातील वेळ काढून विद्यार्थ्यांना जवळ घेऊन बसले पाहिजे. घरगुती काम करत असताना आपल्या मुलांजवळ आपण बसले पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीम योगिता घारे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्ते बद्दल कौतुक केले.इंग्रजीच्या माध्यमाच्या पालकांना विंनती केली की जिल्हा परिषदेच्या शाळेत आपले पाल्य टाका.शाळेचे या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने केली. श्रीमती अंजलीताई अत्रे यांनी पोहेगाव केंद्रातील शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पोहेगाव नागरी पतसंस्थेचे मार्गदर्शक नितीनराव औताडे,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम, शहापूर गावचे सरपंच योगिता घारे, उपसरपंच सागर घारे ,पोलीस पाटील खंडीझोड, ग्रामसेवक सुरेश राहणे,शहापुर विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन राजेंद्र पाचोरे ल,व्हासचेरमन सुभाष सदाफळ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष अंकुश घारे,चंदू भाऊ खंडिझोड,सतीश घारे,मोरे बाबासाहेब,चांगदेव पाचोरे,नितीन पाचोरे,भाऊसाहेब घारे,सागर घारे,दत्तूभाऊ पाचोरे, कविता पाचोरे,निशा खंडिझोड,कविता घारे,शरद घारे,दिपक खंडीझोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पालक वर्ग व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता.शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील चिमुकल्यांनी एकापेक्षा एक अशा हिंदी, मराठी ,देशभक्ती ,पोवाडा, शेतकरी गीत,ऐतिहासिक नाटीका, सादर करून उपस्थित सर्व मान्यवर पालकांची मने जिंकली.गावातील सर्व ग्रामस्थांनी बालकलाकारांचे कौतुक करून बक्षिसे दिले. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व अंगणवाडी मदतनीस सेविका यांचे मोलाचे प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नंदू दिघे व श्रीम राजश्री सोनवणे यांनी केले. आभार श्री.भास्कर सोनवणे यांनी मानले.