ब्रेकिंग

थोरात कारखान्याकडून झालेल्या सन्मानाने सेवानिवृत्त कर्मचारी भारावले

थोरात कारखान्याकडून झालेल्या सन्मानाने सेवानिवृत्त कर्मचारी भारावले



संगमनेर । विनोद जवरे ।

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला मिळाली आहे . ही परंपरा जोपासताना थोरात कारखान्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा केलेला सन्मान आणि आदरतिथ्य यामुळे हे 500 सेवानिवृत्त कर्मचारी भारावून गेले. अनेक दिवसांनी जुन्या सहकाऱ्यांना भेटल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदा अश्रू तराळले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, सौ कांचनताई थोरात, मा. आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,  सौ दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, संतोष हासे यांच्या हस्ते या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजीराव पा.खेमनर, रणजीत सिंह देशमुख लहानुभाऊ गुंजाळ, आर.बी.राहणे,मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, इंद्रजीत भाऊ थोरात, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, सुनंदाताई जोर्वेकर ,घुलेवाडीच्या सरपंच सौ.निर्मलाताई राऊत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फेटा, शाल ,अमृतमंथन ,अमृतगाथा हे पुस्तक व 15 किलो साखर देऊन सन्मानित करण्यात आले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात सहकारातून समृद्धी निर्माण केली. साखर  कारखान्यात अनेक वर्ष सेवा देऊन काम केलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कारखान्याने मोठा सन्मान केला. वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या 100 कामगारांना सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. तर इतर 400 कामगारांना यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अनेक वर्षे एकत्र काम केलेले हे जुने सहकारी एकमेकाला भेटल्यानंतर जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले तर जुन्या आठवणी सांगताना प्रत्येक जण भारावून बोलत होता. यावेळी प्रत्येकाजवळ जाऊन प्रेमाने आपुलकीने संवाद साधत आमदार थोरात यांनी या ज्येष्ठांचा सन्मान केला. याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. सहकारी संस्था आणि कारखान्यामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था शैक्षणिक संस्था या राज्यात अग्रगण्य ठरले असून आज संगमनेर तालुका हा राज्यातील वैभवशाली तालुका म्हणून ओळखला जातो आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आपण सर्व कार्यकर्ते असून या तालुक्याच्या विकासात सर्वांचा सहभाग राहिला आहे. हीच परंपरा आपल्याला पुढे जोपासताना सर्वांनी विकास कामांच्या पाठीशी कायम भक्कम उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार , मिनानाथ वर्पे ,इंद्रजीत खेमनर,संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे ,माणिक यादव ,सौ मंदाताई वाघ ,रामदास वाघ, संभाजी वाकचौरे, सौ मीराताई शेटे, सेक्रेटरी किरण कानवडे, ॲड.शरद गुंजाळ, भास्कर पानसरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले  तर व्हाईस चेअरमन संतोष हासे  यांनी आभार मानले


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधेसह आनंद क्लब ची स्थापना

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस सहकारी संस्थांसाठी काम केलेले असते त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात त्यांच्या जीवनात आनंद राहावा याकरता एक आनंद क्लब स्थापन करून या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी, तपासणी याकरता एसएमबीटी हॉस्पिटल मार्फत स्वतंत्रपणे विभाग सुरू करून या कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी असेही आमदार थोरात यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!