ब्रेकिंग

आ. थोरात यांच्या प्रयत्नांतून पर्यटन विकासासाठी 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर

आ. थोरात यांच्या प्रयत्नांतून पर्यटन विकासासाठी 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर


संगमनेर । विनोद जवरे ।

 काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थान परिसर सुशोभीकरण कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे
या निधीबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठा निधी मिळवला असून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्तीसाठी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. आ.बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीवरून व पाठपुराव्यातून तालुक्यातील विविध गावांकरता प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2022- 23 अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे .यामधून 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी देवस्थान परिसर सुशोभीकरणा साठी मिळाला आहे .

या अंतर्गत तळेगाव दिघे येथील बिरोबा मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपये ,साकुर येथील वीरभद्र देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये ,धांदरफळ खुर्द येथील बिरोबा देवस्थान परिसर सुशोभीकरण 15 लाख रुपये, मिरपूर येथील आवजीनाथ देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये, पारेगाव खुर्द येथील मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण 15 लाख रुपये ,खांडगाव येथील कपालेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण 20 लाख रुपये, वेल्हाळे येथील खंडोबा देवस्थान परिसर सुशोभीकरण 15 लाख रुपये ,वडगाव लांडगा येथील काशाई माता मंदिर परिसर सुशोभीकरण 15 लाख रुपये, पेमगिरी येथील पेमादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण 20 लाख रुपये, घारगाव येथील कळमजाई मंदिर परिसर सुशोभीकरण 25 लाख रुपये ,आंबी खालसा येथील मुळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण 15 लाख रुपये, अकलापुर दत्त देवस्थान सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपये, तर खळी येथील खंडोबा देवस्थान मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असे एकूण तालुक्यात 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .

या अंतर्गत या देवस्थान मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक, काँक्रिटीकरण, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था यांसह सुशोभीकरणाच्या विविध योजना राबवल्या जाणार आहेत. हा निधी मिळवून दिल्याबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात ,आमदार सत्यजित तांबे यांचे तळेगाव दिघे, साकुर, धांदरफळ खुर्द, मिरपुर, पारेगाव खुर्द , वेल्हाळे ,वडगाव लांडगा, पेमगिरी, घारगाव, आंबी खालसा, अकलापूर ,खळी येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे..
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!