कडलग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारली कमान
कडलग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारली कमान
संगमनेर । विनोद जवरे ।
संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश अशोक धोंडीबा कडलग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कडलग परिवाराने कमान उभारली. तिचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि.४) रोजी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कडलग परिवारातील सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्य यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, सरपंच सतीश पथवे, उपसरपंच नीलेश कडलग, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक विनोद हासे, कारभारी उगले, ज्ञानेश्वर सहाणे, अॅड. बाबासाहेब सुर्वे, दिवंगत जिल्हा न्यायाधीश अशोक कडलग यांच्या पत्नी अँड. मीनाक्षी कडलग, चंद्रकांत कडलग, अॅड. अनिल गोडसे, जिजाबा हासे, माधव नेहे, विष्णुपंत रहाटळ आदी यावेळी उपस्थित होते.आमदार थोरात यांनी दिवंगत जिल्हा न्यायाधीश अशोक कडलग यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी केले. भारतातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते जवळे कडलग येथे दिवंगत आमदार कॉमेड दत्ता देशमुख यांच्या भेटीला यायचे. असे प्राचार्य डॉ. कडलग यांनी सांगत जवळे कडलग गावचे महत्त्व विशद केले. कमानीवर विळा-हातोडा ठेवण्याचा उद्देश त्यांनी सांगितला. उपसरपंच कडलग हे मार्केट कमिटीवर संचालक म्हणून विजयी झाल्याने त्यांच्यासह कमान उभारणारे जनार्दन पवार, अरुण पवार, सरपंच पथवे यांचा आमदार थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.