ब्रेकिंग
डॉ.महेश भाऊसाहेब कडू यांना सिम्बॉयसिस विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान
डॉ.महेश भाऊसाहेब कडू यांना सिम्बॉयसिस विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान

संगमनेर । विनोद जवरे ।
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इअँडटीसी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक महेश भाऊसाहेब कडू यांना नुकतीच सिमबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे इअँडटीसी इंजिनिअरिंग क्षेत्रातील पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी “डेव्हलपमेंट ऑफ हाय असोलेशन मायक्रोस्ट्रीप अँटेना अरे” या विषयावर प्रबंध सादर केला. दूरसंचार अभियांत्रिकी मधील सूक्ष्म अँटेना क्षेत्रात त्यांनी संशोधन करून अनेक अँटेना एकत्रित करताना त्यामधील अलगीकरण करण्यात ते यशस्वी झाल्याने भविष्यात फाईव्ह जी क्षेत्रात त्याचा वापर होणार आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीरजी तांबे, विश्वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्टर प्राध्यापक व्ही.पी.वाघे तसेच विभागप्रमुख डॉ. आर. पी. लबडे यांनी येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. महेश कडू सात्रळ तालुका राहुरी गावातील असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुण कडू पाटील, मा. किरण कडू तसेच सामाजिक कार्यकर्ते पंकज कडू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
