सर्वांच्या हक्काचा युवा मित्र – इंजि.सुभाष सांगळे
सर्वांच्या हक्काचा युवा मित्र – इंजि.सुभाष सांगळे
कोपरगांव । विनोद जवरे ।
काँग्रेसचे मा. प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. सहकार, शिक्षण ,ग्रामीण विकास, व्यापार, दुग्ध व्यवसाय याचबरोबर कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेल्या या तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांमधील सुसंस्कृत व उच्चशिक्षित असलेल्या सर्वांच्या हक्काचा युवा मित्र म्हणजे अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभियंता सुभाष सांगळे होय.अहमदनगर जिल्ह्याच्या व संगमनेर तालुक्याच्या टोकावर असलेल्या देवकौठे सारख्या ग्रामीण भागातून येऊन आपला संस्कृत स्वभाव व स्वकष्टातून इंजिनीयर सुभाष सांगळे यांनी आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ सुधीरजी तांबे , आमदार सत्यजित तांबे, इंद्रजित भाऊ थोरात व कॅन्सर तज्ञ जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका व जिल्हा आणि राज्य पातळीवर मोठा मित्रपरिवार निर्माण केला.
प्रगतशील शेतकरी असलेले वडील लक्ष्मणराव सांगळे हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात तीर्थरूप दादा यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते. यामुळे बालपणापासूनच काँग्रेस आणि पुरोगामी विचारसरणीसह नामदार बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सुभाष सांगळे यांच्यावर कायम राहिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर गावातच शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमृतवाहिनी मधून सिव्हिल इंजिनीयर ही पदवी घेऊन त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. नवनिर्मिती, गुणवत्तापूर्वक काम व वेळेत काम करण्याची पद्धत यामुळे त्यांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात अगदी अल्पकाळात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. संगमनेर मधील अनेक वैभवशाली इमारती त्यांनी उभ्या केल्या आहेत. यामध्ये अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, फार्मसी, शेतकी संघ, सह्याद्री महाविद्यालयाचे विज्ञान भवन, यशोधन कार्यालयासमोरील टॉप टेन बिल्डिंग, ते कारखाना ऑफिसचे नव्याने होत असलेले अद्यावत कार्यालय , शासकीय इमारती,अशा अनेक इमारतींचा समावेश असून नाशिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामाच्या विविध साईट सुरू आहेत.कामाबरोबरच समाजकार्याची असलेली आवड यातून त्यांनी सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसमध्ये काम सुरू केले उच्चशिक्षित, मीतभाषी स्वभाव सर्वांना समजून घेण्याची पद्धत आणि कामाचा पाठपुरावा यामुळे ते युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले तसेच लहान थोरांमध्ये पाठपुराव्यासाठी हक्काचा माणूस म्हणून सर्वजण त्यांच्याकडे मोठे आशेने पाहू लागले.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला भोजापुर चारीच्या पूर पाण्यासाठी त्यांची असणारी धडपड, यासाठी नामदार थोरात साहेब, इंद्रजीत भाऊ थोरात व कारखान्याकडे करत असलेल्या सातत्याने पाठपुरावा आणि निमोन व तळेगाव गटातील युवकांचे पाठबळ , तसेच या पाण्यासाठी अनेक रात्री- रात्री ते या चारीवर जागून काढत आहेत.यामुळे मागील चार वर्षापासून ते देवकवठेपर्यंत पाणी पोहोचवण्यात यशस्वी ठरले आहे .त्यामुळे या भागात हक्काचा पाणीदार म्हणून माणूस म्हणून त्यांना ओळखले जात आहे.देवकौठे गाव हे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने आर्थिक प्रगती करत असून या गावातील दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, शालेय शिक्षण, सहकार आणि गावचा विकास यामध्ये सुभाष सांगळे यांचा पुढाकार राहिला आहे. मराठी ,हिंदी, इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व, विषयाची मांडणी, यामुळे मोठ्या सभांमधून त्यांनी केलेली अनेक भाषणे ही लक्षवेधी ठरली आहेत. त्यांच्या सुस्वभावामुळे नामदार बाळासाहेब थोरात यांनी Shampro या सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष पद याचबरोबर अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन राजकारण समाजकारण व सहकारात काम करण्याची संधी दिली असून त्यांनी ती पूर्ण कार्यक्षमतेने व जबाबदारीने पार पाडली आहे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव ,निमोण भागात युवकांचे मोठे संघटन करून प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा सातत्याने पुढाकार असतो.काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्षपद सांभाळताना कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळी ते दिल्लीपर्यंत होणारे पक्षाचे विविध कार्यक्रम, सभा, मोर्चा आंदोलने यामध्ये सक्रिय सहभाग घेत युवकांना प्रोत्साहित केले आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी यथायोग्य पार पडताना सर्वांना सोबत घेऊन गेलेले काम मोठे संघटन लहान थोरांची आपुलकीने वागण्याची पद्धत यामुळे सर्वांसाठी हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.अशा या खऱ्या अर्थाने समाज अभियंता असलेल्या युवा मित्रास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा