गिताबाई म्हाळसकर यांचे मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण
गिताबाई म्हाळसकर यांचे मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील वेस – सोयगांव येथील जुन्या पिढीतील आदर्श माता कै. गं. भा. गिताबाई लक्ष्मण म्हाळसकर यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी साईसृष्टी मंगल कार्यालय जवळके येथे होणार आहे.
कै. गं. भा. गिताबाई लक्ष्मण म्हाळसकर या आदर्श माता होत्या. आपल्या कुटुंबावर त्यांनी चांगले संस्कार केले. प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह. भ. प. रेखाताई काकड यांची कीर्तन सेवा यावेळी होणार आहे. पुण्यस्मरण कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ९ : ३० वाजता प्रतिमापूजन सकाळी १० ते १२ कीर्तन दुपारी १२ नंतर अन्नप्रसाद अशी असणार आहे.
कै. गं. भा. गिताबाई म्हाळसकर यांचे निधन झाले त्यावेळी त्या ८५ वर्षांच्या होत्या. कोपरगाव तालुक्यातील गोपाजी बाबा पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हाळसकर यांच्या मातोश्री असून त्या कोपरगांव तालुक्यामध्ये एक शिस्तबध्द तसेच सामाजिक, धार्मिक कार्याची आवड असणारे आणि गोरगरीब आणि वंचित लोकांची सेवा करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. कै. गं. भा. गिताबाई म्हाळसकर यांच्या भरभक्कम पाठिब्यावर शेतीबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे यश संपादन केले आहे. आज दुर्मिळ झालेली एकत्र कुटुंबपध्दती म्हाळसकर परिवाराने आजही जपुन ठेवली आहे.आयोजित केलेल्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन म्हाळसकर परिवाराच्या वतीने केले आहे.