ब्रेकिंग
आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 99.70 % वसुली देत संगमनेर जिल्ह्यात प्रथम

संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने याही वर्षी आपल्या कर्ज फेडीची परंपरा कायम राखली असून अहमदनगर जिल्हा बँकेत 30 जून 2023 अखेर 99.70% इतकी उच्चांकी वसुली देत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक राखला असल्याची माहिती उपाध्यक्ष ॲड .माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व मेंबर पातळीवर चांगली वसुली झाली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीच्या व आदर्श तत्त्वांवर संगमनेरचा सहकार कार्यरत असून कर्ज परतफेडची परंपरा कायम राखताना यावर्षी 99.70% इतकी उच्चांकी वसुली दिली आहे.

यामध्ये मेंबर पातळीवर जोर्वे, निंबाळे ,घुलेवाडी, मालदाड, म्हसवंडी , कौटेवाडी, निमगाव भोजापूर, मिरपुर व पिंपळगाव माथा या नऊ विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांनी शंभर टक्के कर्ज वसुली दिली आहे. तर बँक पातळीवर शंभर टक्के वसूल देणाऱ्या 38 पैकी 36 शाखा आहेत .तर 134 विकास सोसायट्यांपैकी 132 संस्था 100% वसुली झालेले आहेत. यामध्ये सन 2022- 23 अंतर्गत संगमनेर तालुक्यातून 277 कोटी 15 लाख रुपयांची वसुली झाली आहे. या वसुली साठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड .माधवराव कानवडे, संचालक गणपतराव सांगळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, वसुली अधिकारी उल्हास शिंदे ,तालुका सचिव प्रकाश कडलग,सर्व बँकांचे शाखाधिकारी, बँक सेवक ,विविध सोसायटी यांचे सचिव, तसेच विकास सेवा सोसायटी यांचे चेअरमन ,व्हा. चेअरमन, संचालक मंडळ ,सभासद वर्ग या सर्वांच्या अथक प्रयत्नातून ही वसुली झाली आहे.
बँकेच्या चांगल्या कामकाज पद्धती बद्दल काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड .माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात ,बाबा ओहोळ ,कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, रणजीत सिंह देशमुख आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे