माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त बहादराबाद येथे शासकीय योजना लाभासाठी शिबीर संपन्न
माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त बहादराबाद येथे शासकीय योजना लाभासाठी शिबीर संपन्न
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा हेच संघटन” या भारतीय जनता पार्टीच्या तत्त्वानुसार आज ग्रामपंचायत बहादराबाद च्या वतीने, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना. या योजनेंच्या अंमलबजावणीसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी ग्रामस्थांनी सहभागी होत सदर योजनेंच्या लाभासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले.
यावेळी मा स्नेहलताताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बहादराबाद गावठाण अंगणवाडीला ग्रामपंचायतच्या वतीने बेंच देण्यात आले, तसेच जि प प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक तारडे सर, शिबिरासाठी उपस्थित प्रदिप पठारे, किरण गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सोनाली पाचोरे इ मान्यवरांचा ग्रामपंचायतच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर प्रसंगी वि का सोसायटीचे चेअरमन श्री साहेबराव पाचोरे, मा सरपंच श्री विक्रम पाचोरे, पोलीस पाटील श्री आप्पासाहेब पाचोरे, मा.चेअरमन दत्तुआप्पा पाचोरे, सरपंच सौ.अश्विनी पाचोरे, श्री शिवाजी पाचोरे, श्री रामनाथ पाचोरे,श्री बाजीराव पाचोरे, वैभव पाचोरे, सुभाष पाचोरे, रामदास पाचोरे, दत्तात्रय पाचोरे, ग्रामसेवक श्रीम अनिता दिवे, मुख्याध्यापक श्रीम स्वाती गुळवे, अंगणवाडीसेविका सौ हिराबाई दरेकर, सौ सुलोचना पाचोरे, संगिता पाचोरे, अशोक सरवार, प्रविण घारे,यांसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.